S M L

जसवंत सिंग भाजपमध्ये परतणार

21 मेमाजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांनी पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याचे संकेत दिले आहेत. आयबीएन नेटवर्कशी बोलताना जयवंत सिंह यांनी हे संकेत दिले आहेत. आयबीएन नेटवर्कला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते म्हणाले, की भाजप माझ्या रक्तातच आहे. 32 वर्षांपासून मी पक्षात आहे. मी पक्षाला विसरु शकत नाही.नुकतीच माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांच्या अंत्यविधीला ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांनी एकत्र हजेरी लावली. त्यानंतरच जसवंत सिंहांच्या स्वगृही परतण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. याचसंदर्भात विचारले असता, जसवंत सिंह यांनी भाजपमध्ये परतण्याची शक्यता फेटाळून लावली नाही. फाळणीसाठी जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरत जसवंत सिंहांनी आपल्या पुस्तकातून मोहम्मद अली जिना यांची स्तुती केली होती. त्याबद्दल 9 महिन्यांपूर्वी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2010 09:34 AM IST

जसवंत सिंग भाजपमध्ये परतणार

21 मे

माजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांनी पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आयबीएन नेटवर्कशी बोलताना जयवंत सिंह यांनी हे संकेत दिले आहेत. आयबीएन नेटवर्कला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते म्हणाले, की भाजप माझ्या रक्तातच आहे. 32 वर्षांपासून मी पक्षात आहे. मी पक्षाला विसरु शकत नाही.

नुकतीच माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांच्या अंत्यविधीला ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांनी एकत्र हजेरी लावली. त्यानंतरच जसवंत सिंहांच्या स्वगृही परतण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती.

याचसंदर्भात विचारले असता, जसवंत सिंह यांनी भाजपमध्ये परतण्याची शक्यता फेटाळून लावली नाही.

फाळणीसाठी जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरत जसवंत सिंहांनी आपल्या पुस्तकातून मोहम्मद अली जिना यांची स्तुती केली होती. त्याबद्दल 9 महिन्यांपूर्वी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2010 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close