S M L

खनिज वाहतुकीविरोधात आंदोलन

21 मेरायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीमधील लोहखनिज आणि कोळसा वाहतुकीविरोधात मच्छिमारांनी आंदोलन सुरू केले आहे. अलिबाग आणि पेण तालुक्यातील मच्छिमारही यात सहभागी झाले आहेत. लोह खनिज आणि कोळसा वाहून नेणार्‍या बोटींना खाडी पट्‌ट्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या बोटींमुळे खाडीत प्रदूषण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. खाडीतील प्रदुषणाचा फटका आशीवारे, माणखुले, मोठे शहापूर धेरंड, शहाबाज, कोपरी या गावातील मच्छीमारांना बसला आहे.खाडी किनार्‍याला असणार्‍या शेतीचे बांध फुटल्याने शेतजमिनी नापीक होण्यास सुरुवात झाली आहे. मासेमारीसोबतच शेती व्यवसायही अडचणीत सापडला आहे. खाडी पट्‌ट्यातील बोटींची वाहतूक बंद करावी, मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.या प्रश्नासंदर्भात इस्पात कंपनीला मच्छिमारांनी वेळोवेळी सूचित करूनही कंपनीकडून त्याची दखल घेतली गेलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2010 12:18 PM IST

खनिज वाहतुकीविरोधात आंदोलन

21 मे

रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीमधील लोहखनिज आणि कोळसा वाहतुकीविरोधात मच्छिमारांनी आंदोलन सुरू केले आहे.

अलिबाग आणि पेण तालुक्यातील मच्छिमारही यात सहभागी झाले आहेत. लोह खनिज आणि कोळसा वाहून नेणार्‍या बोटींना खाडी पट्‌ट्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या बोटींमुळे खाडीत प्रदूषण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. खाडीतील प्रदुषणाचा फटका आशीवारे, माणखुले, मोठे शहापूर धेरंड, शहाबाज, कोपरी या गावातील मच्छीमारांना बसला आहे.

खाडी किनार्‍याला असणार्‍या शेतीचे बांध फुटल्याने शेतजमिनी नापीक होण्यास सुरुवात झाली आहे. मासेमारीसोबतच शेती व्यवसायही अडचणीत सापडला आहे. खाडी पट्‌ट्यातील बोटींची वाहतूक बंद करावी, मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

या प्रश्नासंदर्भात इस्पात कंपनीला मच्छिमारांनी वेळोवेळी सूचित करूनही कंपनीकडून त्याची दखल घेतली गेलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2010 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close