S M L

मुंबईच्या राणीबागेत पेंग्विन पाहायला मोजा 100 रुपये

Samruddha Bhambure | Updated On: Jan 7, 2017 02:15 PM IST

मुंबईच्या राणीबागेत पेंग्विन पाहायला मोजा 100 रुपये

06 जानेवारी  : भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेत प्राणी पाहण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

राणीबागेतील प्रवेश शुल्क दहा पटीने वाढवण्यात येत आहे. विशेष म्हणजे पेंग्विन पाहण्यासाठी पालकांना 100 रुपये आणि 12  वर्षांखालील मुलांना 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

राणीबागेतील प्रवेश शुल्क याआधी 2003 मध्ये वाढवण्यात आले होते. त्यानुसार सध्या प्रौढांना 5 रुपये तर 12 वर्षाखालील मुलांना 2 रुपये एवढे शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामधे आता या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचे प्रशासनाने सुचवले आहे. राणीबागेचा विकास 2012 सालापासून पासून सुरू आहे.

दक्षिण कोरियातून काही महिन्यांपूर्वी या राणीबागेत 8 हंबोल्ट पेंग्विन  आणण्यात आले. त्यापैकी एकाचा सुमारे दोन महिन्यांपूर्वी संसर्गाने मृत्यू झाला. त्यामुळे अन्य पेंग्विनना सध्या इंटेरपिटिशन सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी असलेल्या काचेच्या पिंजऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच पेंग्विनचा पिंजरा तयार होऊन त्याचे उद्घाटन होऊन लोकांना पेंग्विन पाहता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2017 01:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close