S M L

फ्लोरिडा विमानतळावर अंदाधुंद गोळीबार; 5 ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jan 7, 2017 04:57 PM IST

फ्लोरिडा विमानतळावर अंदाधुंद गोळीबार; 5 ठार

07 जानेवारी :  फ्लोरिडामध्ये एअरपोर्टवर झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण अमेरिका हादरलीय. फ्लोरिडामधल्या फोर्ट लॉडरडेल एअरपोर्टवर एका इसमाने हा गोळीबार केला. यात पाच जण मृत्युमुखी पडले तर आठजण जखमी झाले. एअरपोर्टवरच्या बॅगेज क्लेम एरियामध्ये एका इसमाने हा गोळीबार केला.

एअरपोर्टवर असलेल्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केलाय. एस्टेबान सँतियागो या 26 वर्षांच्या इसमाने हा गोळीबार केला. विशेष म्हणजे एस्टेबान सँतियागो या तरुण सैनिकाने इराक युद्धामध्ये वाखाणण्यासारखी कामगिरी केलीय. हा हल्ला हे दहशतवादी कृत्य असू शकतं, असा तपास यंत्रणांचा संशय आहे. एस्टेबान सँतियागोचं मानसिक संतुलन बिघडलंय, असा दावा प्रसारमाध्यमांनी केलाय. सरकार त्याला जिहादी व्हिडिओ बघायला भाग पाडत होतं, असंही त्याचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2017 04:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close