S M L

नागपुरात आचाऱ्याकडून पाच मुलीचा विनयभंग

Samruddha Bhambure | Updated On: Jan 7, 2017 06:22 PM IST

नागपुरात आचाऱ्याकडून पाच मुलीचा विनयभंग

07 जानेवारी :  नागपूरजवळच्या तुली पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या पाच आदिवासी विद्यार्थिनींचा आचाऱ्यानं विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी जिल्ह्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकरिता विशेष योजना राबवण्यात येतं आहे. त्यांच्या संपूर्ण शालेय शिक्षणाचा खर्च राज्य सरकार करते. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. या पाचही पीडित मुली या योजनेअंतर्गत तुली पब्लिक स्कूलमध्ये शिकत होत्या. निवासी शाळा असल्याने त्यांच्या जेवण्याची व्यवस्था ही खाणावळीत होती. या खाणावळीतील आचारी जमीर बापत्ती हा या मुलींची छेड काढत होता.

याबाबत या मुलींनी तक्रार तक्रारीनंतर आदिवासी प्रकल्प विकास अधिकाऱ्यांनी जमीरला अटक करण्यात आलीये. पण तुली पब्लिक स्कूल सारख्या संस्थेत विद्यार्थिनींचा विनयभंग होत असल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2017 06:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close