S M L

'उच्च शिक्षण आयोग चुकीचा'

21 मेविद्यापीठ अनुदान आयोग, केंद्रीय शिक्षक परिषद आणि भारतीय तंत्रशिक्षण परिषद रद्द करून त्याजागी आणण्यात येणारा उच्च शिक्षण आयोग हा चुकीचा निर्णय असल्याचे मत युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी आज मुंबईत व्यक्त केले. ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंबंधीचा एक अहवालच प्रकाशित करण्यात आला आहे. एनसीएचईआर म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन ऍण्ड रिसर्च हे विधेयक केंद्र सरकारच्या एचआरडी मंत्रालयाने प्रस्तावित केले आहे. त्यासाठीचा मसुदा सध्या चर्चेसाठी ठेवण्यात आलाय. पण हा आयोग म्हणजे उच्च शिक्षणातले सर्वाधिकार केंद्राकडे देण्याचा प्रकार आहे. राज्यांचे अधिकार यात डावलले जातील, त्यामुळे एनसीएचईआरच्या मसुद्यात बदल झालेच पाहिजेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. फाऊंडेशनचे सुधींद्र कुळकर्णी यावेळी उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2010 01:41 PM IST

'उच्च शिक्षण आयोग चुकीचा'

21 मे

विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्रीय शिक्षक परिषद आणि भारतीय तंत्रशिक्षण परिषद रद्द करून त्याजागी आणण्यात येणारा उच्च शिक्षण आयोग हा चुकीचा निर्णय असल्याचे मत युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी आज मुंबईत व्यक्त केले.

ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंबंधीचा एक अहवालच प्रकाशित करण्यात आला आहे. एनसीएचईआर म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन ऍण्ड रिसर्च हे विधेयक केंद्र सरकारच्या एचआरडी मंत्रालयाने प्रस्तावित केले आहे. त्यासाठीचा मसुदा सध्या चर्चेसाठी ठेवण्यात आलाय.

पण हा आयोग म्हणजे उच्च शिक्षणातले सर्वाधिकार केंद्राकडे देण्याचा प्रकार आहे. राज्यांचे अधिकार यात डावलले जातील, त्यामुळे एनसीएचईआरच्या मसुद्यात बदल झालेच पाहिजेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. फाऊंडेशनचे सुधींद्र कुळकर्णी यावेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2010 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close