S M L

अंगावर झाड कोसळून मुलाचा मृत्यू

21 मेवादळी वार्‍यामुळे वडाचे झाड कोसळून त्याखाली क्रिकेट खेळणार्‍या मुलाने प्राण गमावल्याची हृदयद्रावक घटना आज सोलापुरात घडली. सोलापुरातील रेवणसिध्द मंदिराच्या परिसरात ही घटना घडली. महितबा तांबोळी असे मृत्यूमुखी पडलेल्या 16 वर्षीय मुलाचे नाव आहे.झाडाच्या बुंध्याखाली दबलेल्या महितबाला काढण्याचा नागरिकांनी बराच प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासभर प्रयत्न करून त्याची बुंध्याखालून सुटका केली. त्यानंतर उपचारासाठी त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण तिथेच त्याचा मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2010 06:12 PM IST

अंगावर झाड कोसळून मुलाचा मृत्यू

21 मे

वादळी वार्‍यामुळे वडाचे झाड कोसळून त्याखाली क्रिकेट खेळणार्‍या मुलाने प्राण गमावल्याची हृदयद्रावक घटना आज सोलापुरात घडली.

सोलापुरातील रेवणसिध्द मंदिराच्या परिसरात ही घटना घडली. महितबा तांबोळी असे मृत्यूमुखी पडलेल्या 16 वर्षीय मुलाचे नाव आहे.

झाडाच्या बुंध्याखाली दबलेल्या महितबाला काढण्याचा नागरिकांनी बराच प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासभर प्रयत्न करून त्याची बुंध्याखालून सुटका केली.

त्यानंतर उपचारासाठी त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण तिथेच त्याचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2010 06:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close