S M L

निरोपाच्या भाषणात ओबामा झाले भावुक

Sonali Deshpande | Updated On: Jan 11, 2017 10:59 AM IST

निरोपाच्या भाषणात ओबामा झाले भावुक

11 जानेवारी :अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामांचं आज निरोपाचं भाषण झालं.यातही त्यांनी 'येस वुई कॅन'चा नारा दिला.

येस वी कॅन अँड वी डिड, अशी घोषणा त्यांनी दिली.भाषणा दरम्यान ते भावुकही झाले. त्यांनी आपल्या भाषणात वारंवार ट्रम्प यांच्या धोरणांवर नाव न घेता टीका केली. आपल्याकडे लोकशाही आहे म्हणून आपण बलाढ्य आहोत.याला हाकलून देईन, त्याला देशात घेणार नाही, असं आपण म्हटलं तर आपण जे आहोत ते राहणार नाही.अमेरिकेला उतरती कळा लागेल, असं ते म्हणाले.

लोकशाहीला गृहित धरू लागलो की त्याची विल्हेवाट लागायला सुरुवात होते, असं ते म्हणाले. त्यांच्या या भाषणाला जगभरातून दाद मिळतेय. भाषण झाल्यावर त्यांची पत्नी मिशेल आणि मुलगी मालिया स्टेजवर आले आणि ओबामांनी त्यांचेही आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2017 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close