S M L

फी वाढीला सरकारचा चाप

22 मेखाजगी विनाअनुदानित शाळांच्या मनमानी फी वाढीला चाप लावणारा जीआर अखेर राज्यसरकारने जाहीर केला. 15 पानांच्या या जीआरमध्ये अत्यंत महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत.कुमुद बन्सल समिती आणि शिक्षण संचालकांच्या समितीच्या शिफारसी लक्षात घेऊन हा जीआर काढण्यात आला आहे. खाजगी शाळांच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच या समितीने शाळेला मंजूर करून दिलेल्या फी संदर्भात कुणालाही अपिल करायचे असल्यास शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली राज्य शिक्षण शुल्क समितीचीही स्थापना करणण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे फी वाढीचा प्रस्ताव हा शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधी 6 महिने पालक शिक्षक सभेसमोर ठेवण्याचे बंधन शाळेच्या मॅनेजमेंटवर घालण्यात आले आहे.या जीआरवर हरकती कळवण्यासाठी नागरिकांना 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ह्या हरकती तुम्ही शिक्षण संचालक, पुणे यांच्या ई-मेलवर कळवू शकतात.EMAIL - edn@rediffmail.com

आईबीएन लोकमत | Updated On: May 22, 2010 10:10 AM IST

फी वाढीला सरकारचा चाप

22 मे

खाजगी विनाअनुदानित शाळांच्या मनमानी फी वाढीला चाप लावणारा जीआर अखेर राज्यसरकारने जाहीर केला.

15 पानांच्या या जीआरमध्ये अत्यंत महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत.कुमुद बन्सल समिती आणि शिक्षण संचालकांच्या समितीच्या शिफारसी लक्षात घेऊन हा जीआर काढण्यात आला आहे.

खाजगी शाळांच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

तसेच या समितीने शाळेला मंजूर करून दिलेल्या फी संदर्भात कुणालाही अपिल करायचे असल्यास शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली राज्य शिक्षण शुल्क समितीचीही स्थापना करणण्यात आली आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे फी वाढीचा प्रस्ताव हा शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधी 6 महिने पालक शिक्षक सभेसमोर ठेवण्याचे बंधन शाळेच्या मॅनेजमेंटवर घालण्यात आले आहे.

या जीआरवर हरकती कळवण्यासाठी नागरिकांना 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

ह्या हरकती तुम्ही शिक्षण संचालक, पुणे यांच्या ई-मेलवर कळवू शकतात.EMAIL - edn@rediffmail.com

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2010 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close