S M L

ते 7 नशिबवान...

22 मेएअर इंडियाच्या फ्लाईट 182 ने जेव्हा दुबईतून उड्डाण केले, तेव्हा विमानात होते 166 प्रवासी. पण दैवाचा खेळ असा की अपघातातून फक्त सातच जण वाचले. या वाचलेल्यांनीच सांगितलेली ही पुनर्जन्माची कहाणी...सोबतच्या 158 जणांनी या अपघातात जीव गमावला. तेव्हाच मयानकुट्टीसारखे काहीजण वाचले हेच आश्चर्य. अपघाताच्या धक्क्यातून बाहेर येत आता या अनुभवावर ते बोलू लागले आहेत. प्रदीप...दुबईला तंत्रज्ञाचे काम करणार्‍या प्रदीपचा आपण जीवंत आहोत यावर विश्वासच बसत नाही...उमर फारूकही असाच वाचलाय. कोसळलेल्या जळत्या विमानातून तो उडी मारून बाहेर पडला...आणि जीवाच्या आकांताने पळत सुटला...विमानात चढताना यातील प्रत्येकाने एकमेकाला हाय, हॅलो केले असेल. प्रवासासाठी हॅपी जर्नी असंही म्हटलं असेल...पण या सात जणांसारखे इतर 158 जण नशिबवान नव्हते हेच खरं...

आईबीएन लोकमत | Updated On: May 22, 2010 01:34 PM IST

ते 7 नशिबवान...

22 मे

एअर इंडियाच्या फ्लाईट 182 ने जेव्हा दुबईतून उड्डाण केले, तेव्हा विमानात होते 166 प्रवासी. पण दैवाचा खेळ असा की अपघातातून फक्त सातच जण वाचले. या वाचलेल्यांनीच सांगितलेली ही पुनर्जन्माची कहाणी...

सोबतच्या 158 जणांनी या अपघातात जीव गमावला. तेव्हाच मयानकुट्टीसारखे काहीजण वाचले हेच आश्चर्य.

अपघाताच्या धक्क्यातून बाहेर येत आता या अनुभवावर ते बोलू लागले आहेत. प्रदीप...दुबईला तंत्रज्ञाचे काम करणार्‍या प्रदीपचा आपण जीवंत आहोत यावर विश्वासच बसत नाही...

उमर फारूकही असाच वाचलाय. कोसळलेल्या जळत्या विमानातून तो उडी मारून बाहेर पडला...आणि जीवाच्या आकांताने पळत सुटला...

विमानात चढताना यातील प्रत्येकाने एकमेकाला हाय, हॅलो केले असेल. प्रवासासाठी हॅपी जर्नी असंही म्हटलं असेल...पण या सात जणांसारखे इतर 158 जण नशिबवान नव्हते हेच खरं...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2010 01:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close