S M L

शेवटचे 10 मैल...

22 मे22 मे 2010... पहाटे 2 वाजता एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईट नंबर 812 ने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. रशियाचा कॅप्टन ग्लुसिका या विमानाचा इनचार्ज होता... दुबईहून हे विमान साडे चार तास प्रवास करत सकाळी बरोबर 6.30 वाजता मंगलोरला येणे अपेक्षित होते... या विमानात बहुतेक करुन गल्फहून मायदेशी परतणारे केरळचे 166 प्रवासी ऑन बोर्ड होते... त्यात 137 प्रौढ, 19 तरुण, 4 बालके आणि 6 कॅबिन क्रूचा समावेश होता...सकाळी 6.30 वाजता हे बोईंग 737 - 800 मंगलोरच्या टेबल टॉप रनवेजवळ पोहोचले... हवा शांत होती... आकाश ढगाळलेले होते... थोडा पाऊस पडत होता... पण 6 किलोमीटरपर्यंतचे दिसत होते... कॅप्टन ग्लुसिका आणि को पायलट कॅप्टन एस. एस. अहलुवालियांना लँडिंग करण्यासाठी मंगलोर एअरपोर्टकडून हिरवा कंदील मिळाला... रनवे गाठायला 10 मैल उरले असताना कॅप्टनने इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम म्हणजे आयएलएस सुरू केली... पण त्यानंतर जे काही घडले ते एक रहस्यच आहे... विमानाने लँडिंग तर केले... पण त्याचे टच डाऊन हे ठरलेल्या पॉईंटपेक्षा तब्बल 2000 मीटरने पुढे होते... त्यामुळे विमान थांबवण्यासाठी आणि वेगाला आवरण्यासाठी उर्वरित रनवे अपुरा पडला... विमान रनवे सोडून पुढे गेले... कुंपणाला आदळले... विमानतळाची भिंत तोडत ते पुढे गेले... आणि दरीत कोसळले... हे होताना विमानाचे दोन तुकडे झाले होते आणि विमानाने पेट घेतला... आम्हाला मिळालेल्या बातम्यांनुसार एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच एटीसीला विमानाकडून सर्व सिग्नल मिळाले नव्हते... तरी दशकातील या सर्वात भयानक विमान अपघाताचे खरे रहस्य अजूनही उलगडलेले नाही...

आईबीएन लोकमत | Updated On: May 22, 2010 01:49 PM IST

शेवटचे 10 मैल...

22 मे

22 मे 2010... पहाटे 2 वाजता एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईट नंबर 812 ने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. रशियाचा कॅप्टन ग्लुसिका या विमानाचा इनचार्ज होता...

दुबईहून हे विमान साडे चार तास प्रवास करत सकाळी बरोबर 6.30 वाजता मंगलोरला येणे अपेक्षित होते... या विमानात बहुतेक करुन गल्फहून मायदेशी परतणारे केरळचे 166 प्रवासी ऑन बोर्ड होते... त्यात 137 प्रौढ, 19 तरुण, 4 बालके आणि 6 कॅबिन क्रूचा समावेश होता...

सकाळी 6.30 वाजता हे बोईंग 737 - 800 मंगलोरच्या टेबल टॉप रनवेजवळ पोहोचले... हवा शांत होती... आकाश ढगाळलेले होते... थोडा पाऊस पडत होता... पण 6 किलोमीटरपर्यंतचे दिसत होते... कॅप्टन ग्लुसिका आणि को पायलट कॅप्टन एस. एस. अहलुवालियांना लँडिंग करण्यासाठी मंगलोर एअरपोर्टकडून हिरवा कंदील मिळाला... रनवे गाठायला 10 मैल उरले असताना कॅप्टनने इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम म्हणजे आयएलएस सुरू केली...

पण त्यानंतर जे काही घडले ते एक रहस्यच आहे... विमानाने लँडिंग तर केले... पण त्याचे टच डाऊन हे ठरलेल्या पॉईंटपेक्षा तब्बल 2000 मीटरने पुढे होते... त्यामुळे विमान थांबवण्यासाठी आणि वेगाला आवरण्यासाठी उर्वरित रनवे अपुरा पडला... विमान रनवे सोडून पुढे गेले... कुंपणाला आदळले... विमानतळाची भिंत तोडत ते पुढे गेले... आणि दरीत कोसळले...

हे होताना विमानाचे दोन तुकडे झाले होते आणि विमानाने पेट घेतला... आम्हाला मिळालेल्या बातम्यांनुसार एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच एटीसीला विमानाकडून सर्व सिग्नल मिळाले नव्हते... तरी दशकातील या सर्वात भयानक विमान अपघाताचे खरे रहस्य अजूनही उलगडलेले नाही...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2010 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close