S M L

बागवे-सत्यपाल वाद संपला

22 मेमहाराष्ट्रातील सध्याचा बहुचर्चित रमेश बागवे विरूद्ध सत्यपाल सिंह हा वाद आता संपला आहे. हे सांगितले, खुद्द रमेश बागवे यांनीच. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच या वादात मध्यस्थी केली. गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी सातार्‍यात पत्रकारांना ही माहिती दिली. पोलिस चौक्यांमध्ये गुन्हे नोंदवण्याच्या मुद्द्यापासून या वादाची सुरूवात झाली होती. बागवे यांना पुणे शहरात फिरताना पुण्याचे आयुक्त असलेले सत्यपाल सिंह सुरक्षेसाठीची पायलट कार वापरू देत नव्हते. त्यातूनही हा वाद वाढला होता. एकमेकांचा पाणउतारा करण्याची कुठलीही संधी बागवे किंवा सिंह सोडत नव्हते. विधानपरिषदेत एकदा विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना बागवे यांनी सत्यपाल सिंह यांची बदलीच केली होती. पण सत्यपाल सिंह यांच्या मागे राष्ट्रवादी असल्यामुळे आर. आर. पाटील यांनी त्यांची बदली केली नाही. यावेळचा वाद हा बागवेंच्या पासपोर्टवरून सुरू झाला. बागवेंवर 19 गंभीर गुन्हे असल्यामुळेच पासपोर्ट साठीचा अर्ज फेटाळला गेल्याची बातमी पुणे पोलीस दलातून बाहेर आली होती. त्यानंतर लखमी गौतम या पुण्याच्या पोलीस उपायुक्तांनी तर पत्रकार परिषदच घेऊन या गुन्ह्यांची माहिती दिली होती. त्यातूनच सत्यपाल सिंह यांच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतले गेले होते. या सगळ्या वादात सिंग यांचीच बदली होते की काय, अशी शक्यता निर्माण झाली. अखेर या वादात एकदाची तडजोड घडवून आणण्यात आर. आर. पाटील यांना यश आले. या तडजोडीच्या बातमीमुळे राष्ट्रवादीला सत्यपालसिंह यांची पुण्याबाहेर बदली नकोच आहे. त्यासाठी ते पडेल ती किंमत मोजायला तयार आहेत, असे चित्रही निर्माण झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 22, 2010 03:25 PM IST

बागवे-सत्यपाल वाद संपला

22 मे

महाराष्ट्रातील सध्याचा बहुचर्चित रमेश बागवे विरूद्ध सत्यपाल सिंह हा वाद आता संपला आहे. हे सांगितले, खुद्द रमेश बागवे यांनीच.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच या वादात मध्यस्थी केली. गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी सातार्‍यात पत्रकारांना ही माहिती दिली.

पोलिस चौक्यांमध्ये गुन्हे नोंदवण्याच्या मुद्द्यापासून या वादाची सुरूवात झाली होती. बागवे यांना पुणे शहरात फिरताना पुण्याचे आयुक्त असलेले सत्यपाल सिंह सुरक्षेसाठीची पायलट कार वापरू देत नव्हते. त्यातूनही हा वाद वाढला होता.

एकमेकांचा पाणउतारा करण्याची कुठलीही संधी बागवे किंवा सिंह सोडत नव्हते. विधानपरिषदेत एकदा विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना बागवे यांनी सत्यपाल सिंह यांची बदलीच केली होती. पण सत्यपाल सिंह यांच्या मागे राष्ट्रवादी असल्यामुळे आर. आर. पाटील यांनी त्यांची बदली केली नाही. यावेळचा वाद हा बागवेंच्या पासपोर्टवरून सुरू झाला.

बागवेंवर 19 गंभीर गुन्हे असल्यामुळेच पासपोर्ट साठीचा अर्ज फेटाळला गेल्याची बातमी पुणे पोलीस दलातून बाहेर आली होती. त्यानंतर लखमी गौतम या पुण्याच्या पोलीस उपायुक्तांनी तर पत्रकार परिषदच घेऊन या गुन्ह्यांची माहिती दिली होती. त्यातूनच सत्यपाल सिंह यांच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतले गेले होते.

या सगळ्या वादात सिंग यांचीच बदली होते की काय, अशी शक्यता निर्माण झाली. अखेर या वादात एकदाची तडजोड घडवून आणण्यात आर. आर. पाटील यांना यश आले.

या तडजोडीच्या बातमीमुळे राष्ट्रवादीला सत्यपालसिंह यांची पुण्याबाहेर बदली नकोच आहे. त्यासाठी ते पडेल ती किंमत मोजायला तयार आहेत, असे चित्रही निर्माण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2010 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close