S M L

एमसीएच्या अध्यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार

Samruddha Bhambure | Updated On: Jan 12, 2017 08:10 PM IST

ashish shelar

12 जानेवारी :  सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज (गुरूवारी) मुंबई क्रिकेट असोसिएशच्या अध्यक्षपदी भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांची निवड करण्यात आली.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद रिक्त राहिलं होते. मात्र, आज झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आशिष शेलार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

दरम्यान, माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2017 08:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close