S M L

पीएमपीएलमधील वाद कायम

अद्वैत मेहता, पुणे24 मेपुण्यात पीएमपीएलमधील वाद अजूनही मिटायला तयार नाही. सामान्य पुणेकर अपुर्‍या बसेसमुळे वैतागला आहे. तर दुसरीकडे भाजप नगरसेवक विकास मठकरींनी यावरून उपोषणाचा इशारा दिला आहे. पीएमपीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यांच्यातील अहंकाराच्या लढाईत वाट लागली आहे, ती सर्वसामान्य पुणेकरांची.पीएमपीची बसखरेदी सध्या वादात अडकली आहे. केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी मिळूनही तब्बल 350 बसेसची खरेदी रखडली आहे. कारण काय तर बस उजव्या दरवाज्याच्या घ्यायच्या की डाव्या दरवाज्याच्या... पीएमपीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हे आपापल्या मतांवर ठाम आहेत. त्यामुळे ही कोंडी फुटायला तयार नाही. बसखरेदीसाठी मंजूर झालेले 96 कोटी लॅप्स होतील म्हणून भाजप नगरसेवक विकास मठकरींनी उपोषणाचा इशारा दिला आहे. तर स्थायी समिती अध्यक्षांनी पीएमपीच्या अध्यक्षांनाच दोन शब्द सुनावलेत.तर बसेस कुठल्याही दरवाज्याच्या असोत, त्या रस्त्यावर दिसल्या पाहिजेत, अशी भूमिका पुणेकरांची आहे.एकूण काय हा टिपीकल पुणेरी वाद आहे. खासदार कलमाडी साहेब दिल्लीत अर्बन डेव्हलपमेंटचे सचिव रामचंद्रन यांना भेटून ही कैफियत मांडतील. मग कदाचित धाकटे पवार मोठ्या पवारांना लक्ष घालायला सांगतील. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा असे हे नाटक चालेल तोपर्यंत सोशिक पुणेकर एएमपीच्या बसेसमधे धक्के खात लोंबकळत राहतील.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 08:10 AM IST

पीएमपीएलमधील वाद कायम

अद्वैत मेहता, पुणे

24 मे

पुण्यात पीएमपीएलमधील वाद अजूनही मिटायला तयार नाही. सामान्य पुणेकर अपुर्‍या बसेसमुळे वैतागला आहे. तर दुसरीकडे भाजप नगरसेवक विकास मठकरींनी यावरून उपोषणाचा इशारा दिला आहे.

पीएमपीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यांच्यातील अहंकाराच्या लढाईत वाट लागली आहे, ती सर्वसामान्य पुणेकरांची.

पीएमपीची बसखरेदी सध्या वादात अडकली आहे. केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी मिळूनही तब्बल 350 बसेसची खरेदी रखडली आहे. कारण काय तर बस उजव्या दरवाज्याच्या घ्यायच्या की डाव्या दरवाज्याच्या...

पीएमपीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हे आपापल्या मतांवर ठाम आहेत. त्यामुळे ही कोंडी फुटायला तयार नाही. बसखरेदीसाठी मंजूर झालेले 96 कोटी लॅप्स होतील म्हणून भाजप नगरसेवक विकास मठकरींनी उपोषणाचा इशारा दिला आहे. तर स्थायी समिती अध्यक्षांनी पीएमपीच्या अध्यक्षांनाच दोन शब्द सुनावलेत.

तर बसेस कुठल्याही दरवाज्याच्या असोत, त्या रस्त्यावर दिसल्या पाहिजेत, अशी भूमिका पुणेकरांची आहे.एकूण काय हा टिपीकल पुणेरी वाद आहे. खासदार कलमाडी साहेब दिल्लीत अर्बन डेव्हलपमेंटचे सचिव रामचंद्रन यांना भेटून ही कैफियत मांडतील.

मग कदाचित धाकटे पवार मोठ्या पवारांना लक्ष घालायला सांगतील. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा असे हे नाटक चालेल तोपर्यंत सोशिक पुणेकर एएमपीच्या बसेसमधे धक्के खात लोंबकळत राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 08:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close