S M L

आदित्य ठाकरेंच्या कारला अपघात,कोणीही जखमी नाही

Sonali Deshpande | Updated On: Jan 15, 2017 02:43 PM IST

आदित्य ठाकरेंच्या कारला अपघात,कोणीही जखमी नाही

15 जानेवारी : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कारला अपघात झालाय. मातोश्रीवरून आदित्य ठाकरे आपल्या बीएमडब्ल्यू कारने खेरवाडी सिग्नलला आल्यावर समोरून एका खासगी कारने सिग्नल जंम्प केला. आणि आदित्य ठाकरे यांच्या कारला धडक दिली.

या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्या बीएमडब्लू कारच्या बोनेटचं नुकसान झालंय. तर धडक देणाऱ्या कारच्या दरवाजांचं नुकसान झालंय.

या अपघातसंदर्भात स्थानिक ट्रॅफिक पोलिसांनी धडक देणाऱ्या कार चालकाला दंड आकारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2017 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close