S M L

'एकच पर्व बहुजन सर्व',सातारा घोषणांनी दुमदुमला

Sonali Deshpande | Updated On: Jan 15, 2017 06:10 PM IST

'एकच पर्व बहुजन सर्व',सातारा घोषणांनी दुमदुमला

15 जानेवारी : कोपर्डी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी,अॅट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, भारतीय संविधानाला कोणताही धक्का लावला जाऊ नये या प्रमुख मागण्यांसाठी आज साताऱ्यात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला.साताऱ्यातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली.मोर्चा राजवाड्यावरून राधिका रोड मार्गे पोवई नाक्यावर आल्यानंतर तिथे विराट सभा घेण्यात आली.

या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी एकच पर्व बहुजन सर्व, अॅट्रॉसिटी कायदा कडक झाला पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2017 06:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close