S M L

बीड आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण

Sonali Deshpande | Updated On: Jan 15, 2017 07:29 PM IST

बीड आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण

15 जानेवारी : बीडमधल्या आश्रमशाळेतही अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं प्रकरण समोर आलंय. शिरूर तालुक्यातील आश्रमशाळेतील शिक्षकच अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सिंदफना आश्रमशाळेतील शिक्षकाने संपूर्ण शिक्षकी पेशालाच काळिमा फासलाय.

दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ही आश्रमशाळा उघडण्यात आलीय.या ठिकाणी राहणाऱ्या पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलीसोबत देवराव मस्के हा शिक्षक चाळे करायचा.मुलींच्या अंगाशी लगट करून त्यांना आंघोळही घालायचा.

या प्रकरणाची तक्रार बीडच्या समाज कल्याण सहआयुक्तांकडे करण्यात आली.आश्रम शाळेतील संस्थाचालक राजकुमार पालवे यांना याची माहिती देण्यात आली.या तक्रारीवरून संस्थाचालक पालवेंनी देवराव मस्केला निलंबित केलंय. मस्के विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2017 07:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close