S M L

खिळवून ठेवणारा राजा..

24 मेमुंबईतील बोधी नाटयमहोत्सवात कल्याणच्या मितीचार या संस्थेचं आला रे राजा हे नाटक सादर झालं. लोकनाट्याच्या अंगाने जाणार्‍या या नाटकातून तरुण कलावंतांनी रचलेली कलाकृती मुंबईकरांना पाहायला मिळाली. राजा शेवटी राजा असला तरी प्रजेशिवाय राजाचं अस्तित्व नसतं हेही तितकचं खरं. पण अशातच राजकारण होतं. बंडाळी होते पण जगणं कोणाचं थांबत नाही, हेच आला रे राजामधून दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. राजकारण हे अनंत कालापासून सुरू आहे. पण हे राजकारण दाखवताना या नाटकातील पात्रांचा पेहराव, बोलणं स्टेजवरचं वावरणं हे सार्वकालिक आहे. त्यामुळं हे नाटक बघतांना प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतो. सत्यदेव दुबेंच्या कार्यशाळेतून तयार झालेल्या दिलीप जगताप या प्रसिध्द लेखकाने हे नाटक लिहिलंय. शिवाय हे नाटक बोधी नाट्यमहोत्सवाच्या व्यासपीठावर सादर होणं प्रेक्षक आणि कलावंताकरता चांगला योग होता. या नाटकातील राजा आणि विदुषक त्यांच्या कसदार अभिनयाने सगळ्यांची दाद घेऊन जातात. पण हे नाटक पाहताना हा विश्वासही पक्का होतो, की आपल्याकडे दर्जेदार लिखाण आणि कलावंताची वाणवा नाही. फक्त हवं आहे, बोधी महोत्सवासारखं हक्काचं व्यासपीठ...

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 12:32 PM IST

खिळवून ठेवणारा राजा..

24 मे

मुंबईतील बोधी नाटयमहोत्सवात कल्याणच्या मितीचार या संस्थेचं आला रे राजा हे नाटक सादर झालं. लोकनाट्याच्या अंगाने जाणार्‍या या नाटकातून तरुण कलावंतांनी रचलेली कलाकृती मुंबईकरांना पाहायला मिळाली.

राजा शेवटी राजा असला तरी प्रजेशिवाय राजाचं अस्तित्व नसतं हेही तितकचं खरं. पण अशातच राजकारण होतं. बंडाळी होते पण जगणं कोणाचं थांबत नाही, हेच आला रे राजामधून दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे.

राजकारण हे अनंत कालापासून सुरू आहे. पण हे राजकारण दाखवताना या नाटकातील पात्रांचा पेहराव, बोलणं स्टेजवरचं वावरणं हे सार्वकालिक आहे. त्यामुळं हे नाटक बघतांना प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतो.

सत्यदेव दुबेंच्या कार्यशाळेतून तयार झालेल्या दिलीप जगताप या प्रसिध्द लेखकाने हे नाटक लिहिलंय. शिवाय हे नाटक बोधी नाट्यमहोत्सवाच्या व्यासपीठावर सादर होणं प्रेक्षक आणि कलावंताकरता चांगला योग होता.

या नाटकातील राजा आणि विदुषक त्यांच्या कसदार अभिनयाने सगळ्यांची दाद घेऊन जातात. पण हे नाटक पाहताना हा विश्वासही पक्का होतो, की आपल्याकडे दर्जेदार लिखाण आणि कलावंताची वाणवा नाही. फक्त हवं आहे, बोधी महोत्सवासारखं हक्काचं व्यासपीठ...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close