S M L

22 मृतदेह ओळखीविना, ब्लॅकबॉक्सही हरवलेलाच

24 मेमंगलोरच्या विमान दुर्घटनेला तीन दिवस उलटलेत. पण अजूनही 22 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. डीएनए टेस्टच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवणे शक्य आहे. पण त्याला किमान एक आठवडा लागेल, असे सांगितले जात आहे.ब्लॅक बॉक्सचा शोध नाहीविमान दुर्घटनेनंतर अजूनही विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा शोध लागलेला नाही. ब्लॅक बॉक्सकडून कुठलेही सिग्नल्स मिळत नाहीत. कारण तो पाण्यात नाही, तर जमिनीवर पडला आहे. त्यामुळेच त्याचा शोध घेणे कठीण जात आहे. घटनास्थळावर ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्यासाठी डीजीसीएने त्याची काही रेखाचित्रे शोध पथक आणि कर्नाटक पोलिसांकडे सोपवली आहेत. दरम्यान अमेरिकेतील केनयॉन इंटरनॅशनल इमर्जन्सी सर्व्हिसचे लोक मृतांच्या नातेवाईकांना मृतदेह शोधण्यासाठी मदत करत आहेत. मंगलोर हॉस्पिटलमधील कोल्ड स्टोअरेज सिस्टीम कोलमडल्यानंतर तेथिल 22 मृतदेह दुसर्‍या शवागृहात पाठवण्यात आले आहेत. तर रशियन वैमानिकाचा मृतदेह त्याच्या घरी पाठवून देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 02:28 PM IST

22 मृतदेह ओळखीविना, ब्लॅकबॉक्सही हरवलेलाच

24 मे

मंगलोरच्या विमान दुर्घटनेला तीन दिवस उलटलेत. पण अजूनही 22 मृतदेहांची ओळख पटलेली नाही.

डीएनए टेस्टच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवणे शक्य आहे. पण त्याला किमान एक आठवडा लागेल, असे सांगितले जात आहे.

ब्लॅक बॉक्सचा शोध नाही

विमान दुर्घटनेनंतर अजूनही विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा शोध लागलेला नाही. ब्लॅक बॉक्सकडून कुठलेही सिग्नल्स मिळत नाहीत.

कारण तो पाण्यात नाही, तर जमिनीवर पडला आहे. त्यामुळेच त्याचा शोध घेणे कठीण जात आहे.

घटनास्थळावर ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्यासाठी डीजीसीएने त्याची काही रेखाचित्रे शोध पथक आणि कर्नाटक पोलिसांकडे सोपवली आहेत.

दरम्यान अमेरिकेतील केनयॉन इंटरनॅशनल इमर्जन्सी सर्व्हिसचे लोक मृतांच्या नातेवाईकांना मृतदेह शोधण्यासाठी मदत करत आहेत.

मंगलोर हॉस्पिटलमधील कोल्ड स्टोअरेज सिस्टीम कोलमडल्यानंतर तेथिल 22 मृतदेह दुसर्‍या शवागृहात पाठवण्यात आले आहेत.

तर रशियन वैमानिकाचा मृतदेह त्याच्या घरी पाठवून देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close