S M L

12वीचा निकाल 72.17 टक्के

25 मे बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 72.17 टक्के लागला आहे. विभागवार निकालांमध्ये, नाशिकने बाजी मारली आहे. नाशिक बोर्डाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 79.08 टक्के लागला आहे. पुण्याचा निकाल 77.20 टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल 72.05 टक्के, मुंबईचा निकाल 70.88 टक्के, अमरावती बोर्डाचा निकाल 77.43 टक्के , तर पॅटर्नसाठी फेमस असलेल्या लातूरचा निकाल सर्वात कमी म्हणजे 44.81 टक्के लागला आहे. 1 लाख 32 हजार 804 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 7 हजार 202 मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलींची संख्या नेहमीप्रमाणेच जास्त आहे. बक्षिसाला पात्र विद्यार्थ्यांची यादी 31 मे रोजी जाहीर करणार असल्याची माहिती औरंगाबाद बोर्डाने दिली आहे.टक्केवारी घसरलीराज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरली आहे. गेल्या वर्षी 78.38 टक्के इतका निकाल होता. त्यामध्ये जवळपास 6 टक्क्यांनी निकालाची टक्केवारी घसरली. या वर्षीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. एमसीव्हीसा शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे 88.55 टक्के इतका आहे. विभागवार निकालात नाशिक विभागाचा सर्वाधिक 79.08 टक्के तर लातूरचा निकाल 44.81 टक्के इतका आहे. विद्यार्थ्यांवरचा परिक्षेचा ताण कमी करण्यासाठी मेरिट लिस्ट बंद केली असली तरी विभागवार टॉपर्सची लिस्ट दिल्याचा आरोप बोर्डावर केला जात होता. म्हणून या वर्षापासून टॉपर्सची लिस्टही बंद करण्यात आली.बारावी निकालाचा पॅटर्न आता दहावीच्या निकालासाठी वापरला जाणार आहे. दहावीचा निकाल लवकरच लागणार आहे. यंदा प्रथमच इंटरनेट आणि एसएमएसच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे. लातूर पिछाडीवरदरवर्षी पहिला मेरिट देणार्‍या लातूर विभागाचा या वर्षी निकाल घसरला आहे.राज्यात लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला असून या विभागात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सामूहिक कॉपी झाल्याने 933 विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्याचा परिणाम या निकालावर झाल्याची बाब पुढे आली आहे. नांदेडच्या मास कॉपीमुळे लातूर पॅटर्नला गालबोट लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2010 05:12 PM IST

12वीचा निकाल 72.17 टक्के

25 मे

बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 72.17 टक्के लागला आहे.

विभागवार निकालांमध्ये, नाशिकने बाजी मारली आहे. नाशिक बोर्डाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 79.08 टक्के लागला आहे.

पुण्याचा निकाल 77.20 टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल 72.05 टक्के, मुंबईचा निकाल 70.88 टक्के, अमरावती बोर्डाचा निकाल 77.43 टक्के , तर पॅटर्नसाठी फेमस असलेल्या लातूरचा निकाल सर्वात कमी म्हणजे 44.81 टक्के लागला आहे.

1 लाख 32 हजार 804 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 7 हजार 202 मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलींची संख्या नेहमीप्रमाणेच जास्त आहे. बक्षिसाला पात्र विद्यार्थ्यांची यादी 31 मे रोजी जाहीर करणार असल्याची माहिती औरंगाबाद बोर्डाने दिली आहे.

टक्केवारी घसरली

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरली आहे. गेल्या वर्षी 78.38 टक्के इतका निकाल होता. त्यामध्ये जवळपास 6 टक्क्यांनी निकालाची टक्केवारी घसरली.

या वर्षीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. एमसीव्हीसा शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे 88.55 टक्के इतका आहे.

विभागवार निकालात नाशिक विभागाचा सर्वाधिक 79.08 टक्के तर लातूरचा निकाल 44.81 टक्के इतका आहे.

विद्यार्थ्यांवरचा परिक्षेचा ताण कमी करण्यासाठी मेरिट लिस्ट बंद केली असली तरी विभागवार टॉपर्सची लिस्ट दिल्याचा आरोप बोर्डावर केला जात होता. म्हणून या वर्षापासून टॉपर्सची लिस्टही बंद करण्यात आली.

बारावी निकालाचा पॅटर्न आता दहावीच्या निकालासाठी वापरला जाणार आहे. दहावीचा निकाल लवकरच लागणार आहे. यंदा प्रथमच इंटरनेट आणि एसएमएसच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे.

लातूर पिछाडीवर

दरवर्षी पहिला मेरिट देणार्‍या लातूर विभागाचा या वर्षी निकाल घसरला आहे.

राज्यात लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला असून या विभागात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सामूहिक कॉपी झाल्याने 933 विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्याचा परिणाम या निकालावर झाल्याची बाब पुढे आली आहे.

नांदेडच्या मास कॉपीमुळे लातूर पॅटर्नला गालबोट लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2010 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close