S M L

आयकॉनिक टॉवरसाठी साडेचार हजारांचे टेंडर

25 मेमुंबईच्या वैभवात भर घालणार्‍या एमएमआरडीच्या आयकॉनिक टॉवरच्या बांधकामासाठीचे टेंडर तब्बल 4 हजार 53 कोटी रुपयांना विकले गेले आहे. लोढा क्राऊन बिल्डमार्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे टेंडर विकत घेतले आहे. मुंबईतील ही सगळ्यात उंच इमारत वडाळा इथे बांधली जाणार आहे. या इमारतीच्या टेंडरसाठी प्रति स्क्वेअर मीटरला 40 हजार रुपये भाव एमएमआरडीने लावला होता. पण लोढा काऊन बिल्डमार्टने दुप्पट दराने म्हणजे 81 हजार 818 रुपये प्रति स्क्वेअर मीटर दराने हे टेंडर घेतले आहे. यातून एमएमआरडीएला तब्बल 4 हजार 53 कोटी रुपयांची घसघशीत कमाई झाली आहे. या इमारतीमध्ये एकूण 50 लाख चौरस फूट जागा उपलब्ध होणार आहे. तसेच या इमारतीत ऊर्जा बचत योजना राबवली जाणार आहे. यात पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. तर एसीमधून निर्माण होणार्‍या उष्णतेचाही पुनर्वापर केला जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2010 05:26 PM IST

आयकॉनिक टॉवरसाठी साडेचार हजारांचे टेंडर

25 मे

मुंबईच्या वैभवात भर घालणार्‍या एमएमआरडीच्या आयकॉनिक टॉवरच्या बांधकामासाठीचे टेंडर तब्बल 4 हजार 53 कोटी रुपयांना विकले गेले आहे.

लोढा क्राऊन बिल्डमार्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे टेंडर विकत घेतले आहे. मुंबईतील ही सगळ्यात उंच इमारत वडाळा इथे बांधली जाणार आहे.

या इमारतीच्या टेंडरसाठी प्रति स्क्वेअर मीटरला 40 हजार रुपये भाव एमएमआरडीने लावला होता. पण लोढा काऊन बिल्डमार्टने दुप्पट दराने म्हणजे 81 हजार 818 रुपये प्रति स्क्वेअर मीटर दराने हे टेंडर घेतले आहे.

यातून एमएमआरडीएला तब्बल 4 हजार 53 कोटी रुपयांची घसघशीत कमाई झाली आहे. या इमारतीमध्ये एकूण 50 लाख चौरस फूट जागा उपलब्ध होणार आहे.

तसेच या इमारतीत ऊर्जा बचत योजना राबवली जाणार आहे. यात पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. तर एसीमधून निर्माण होणार्‍या उष्णतेचाही पुनर्वापर केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2010 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close