S M L

एअर इंडिया कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

26 मेप्रशासनाच्या आदेशाविरोधात संपावर गेलेल्या एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांविरोधात कडक पवित्रा घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे संपावर गेलेल्या देशभरातील कर्मचार्‍यांविरोधात एअर इंडिया मॅनेजमेंटने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. कालपासून एअर इंडियाचे 20 हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. इंजीनिअरही कालपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे एअर इंडियाच्या देशांतर्गत 140 फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत. तर काही आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सही रद्द करण्यात आल्यात. त्यामुळे देशभरातील एअरपोर्ट्सवर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एअर इंडियाचे सीएमडी अरविंद जाधव यांनी संपकरी कर्मचार्‍यांना बिनशर्त संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, कर्मचार्‍यांनी संप मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. याचिकेवर शुक्रवारी सुनावणी दरम्यान कर्मचार्‍यांविरोधात एअर इंडियाने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.संपकरी संघटनांना नव्याने नोटीसा देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2010 10:39 AM IST

एअर इंडिया कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

26 मे

प्रशासनाच्या आदेशाविरोधात संपावर गेलेल्या एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांविरोधात कडक पवित्रा घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना तशा सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे संपावर गेलेल्या देशभरातील कर्मचार्‍यांविरोधात एअर इंडिया मॅनेजमेंटने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

कालपासून एअर इंडियाचे 20 हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. इंजीनिअरही कालपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे एअर इंडियाच्या देशांतर्गत 140 फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत. तर काही आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सही रद्द करण्यात आल्यात.

त्यामुळे देशभरातील एअरपोर्ट्सवर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

एअर इंडियाचे सीएमडी अरविंद जाधव यांनी संपकरी कर्मचार्‍यांना बिनशर्त संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, कर्मचार्‍यांनी संप मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

दरम्यान कर्मचार्‍यांविरोधात एअर इंडियाने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

संपकरी संघटनांना नव्याने नोटीसा देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2010 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close