S M L

राज्यसभा, विधानपरिषदेसाठी चुरस

26 मेराज्यसभा आणि विधानपरिषदेसाठीची चुरस चांगलीच वाढली आहे. प्रत्येक पक्षातील शह-कटशहाच्या राजकारणामुळे उमेद्वारांच्या निवडीआधीच पाडापाडीचे राजकारण आखले जात आहे. काँग्रेसचे नेते कन्हैयालाल गिडवानी यांनी राज्यसभेच्या तिसर्‍या जागेसाठी पक्षाकडे उमेद्वारी मागितली आहे. गिडवानी हे नारायण राणे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांना उमेदवारी दिली तर मनसेची मते काँग्रेसकडे वळतील.काँग्रेसकडे असलेले सध्याचे अपक्ष आमदार आणि मनसे यांची गोळाबेरीज करुनही काँग्रेसला या जागेसाठी 11 मते कमी पडतात. गिडवानी ही मते 'मॅनेज' करु शकले तर राष्ट्रवादीचा राज्यसभेचा दुसरा उमेदवार धोक्यात येतो. म्हणूनच आघाडीच्या आज संध्याकाळी होणार्‍या बैठकीत गिडवाणींच्या मागणीचे पडसाद उमटणार आहेत. दुसरीकडे विधानपरिषदेसाठी काँग्रेसचे 4 , राष्ट्रवादीचे 3, सेना-भाजपचे प्रत्येकी 2 उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसला 4 था उमेदवार निवडून आणण्यासाठी सध्या 11 मतांची गरज आहे. शिवसेनेकडून नावे निश्चितशिवसेनेच्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. या संदर्भातील एक पत्रक शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काढले आहे. त्यात राज्यसभेसाठी खासदार संजय राऊत तर विधान परिषदेसाठी ऍडव्होकेट अनिल परब आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. या उमेदवारीसाठी शिवसेनेत अनेकजण इच्छुक होते. पण शिवसेना नेतृत्वाने पुन्हा एकदा अनुभवी नावांवर शिक्का मोर्तब केले आहे.काँग्रेसमधील इच्छुक उमेदवार पुढीलप्रमाणे - राज्यसभाआनंद शर्माविजय दर्डाबाळासाहेब विखे-पाटीलकन्हैयालाल गिडवाणीविधानपरिषदसंजय लाखे-पाटीलकमलताई व्यवहारेअमर राजूरकरव्यंकटराव बेंद्रेसुभाष बनेशाम सावंतराज्यसभा किंवा विधानपरिषद हुसेन दलवाईसंजय दत्तमुजफ्फर हुसेनराष्ट्रवादीतील इच्छुक उमेदवार पुढीलप्रमाणे - राज्यसभाईश्‍वरलाल जैनतारिक अन्वरडी. पी. त्रिपाठीपितांबर मास्टररामराजे निंबाळकरसूर्यकांता पाटीलनिवेदिता मानेविधानपरिषदविजयसिंह मोहिते-पाटीलसंतोष चौधरीप्रकाश बेंसाळेरामराजे नाईक निंबाळकरभाजपमधील इच्छुक उमेदवार पुढीलप्रमाणे - विधानपरिषदधनंजय मुंडेमधू चव्हाणशोभाताई फडणवीस

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2010 10:54 AM IST

राज्यसभा, विधानपरिषदेसाठी चुरस

26 मे

राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठीची चुरस चांगलीच वाढली आहे. प्रत्येक पक्षातील शह-कटशहाच्या राजकारणामुळे उमेद्वारांच्या निवडीआधीच पाडापाडीचे राजकारण आखले जात आहे.

काँग्रेसचे नेते कन्हैयालाल गिडवानी यांनी राज्यसभेच्या तिसर्‍या जागेसाठी पक्षाकडे उमेद्वारी मागितली आहे. गिडवानी हे नारायण राणे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांना उमेदवारी दिली तर मनसेची मते काँग्रेसकडे वळतील.

काँग्रेसकडे असलेले सध्याचे अपक्ष आमदार आणि मनसे यांची गोळाबेरीज करुनही काँग्रेसला या जागेसाठी 11 मते कमी पडतात. गिडवानी ही मते 'मॅनेज' करु शकले तर राष्ट्रवादीचा राज्यसभेचा दुसरा उमेदवार धोक्यात येतो. म्हणूनच आघाडीच्या आज संध्याकाळी होणार्‍या बैठकीत गिडवाणींच्या मागणीचे पडसाद उमटणार आहेत.

दुसरीकडे विधानपरिषदेसाठी काँग्रेसचे 4 , राष्ट्रवादीचे 3, सेना-भाजपचे प्रत्येकी 2 उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसला 4 था उमेदवार निवडून आणण्यासाठी सध्या 11 मतांची गरज आहे.

शिवसेनेकडून नावे निश्चितशिवसेनेच्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. या संदर्भातील एक पत्रक शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काढले आहे. त्यात राज्यसभेसाठी खासदार संजय राऊत तर विधान परिषदेसाठी ऍडव्होकेट अनिल परब आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. या उमेदवारीसाठी शिवसेनेत अनेकजण इच्छुक होते. पण शिवसेना नेतृत्वाने पुन्हा एकदा अनुभवी नावांवर शिक्का मोर्तब केले आहे.

काँग्रेसमधील इच्छुक उमेदवार पुढीलप्रमाणे -

राज्यसभा

आनंद शर्मा

विजय दर्डा

बाळासाहेब विखे-पाटील

कन्हैयालाल गिडवाणी

विधानपरिषद

संजय लाखे-पाटील

कमलताई व्यवहारे

अमर राजूरकर

व्यंकटराव बेंद्रे

सुभाष बने

शाम सावंत

राज्यसभा किंवा विधानपरिषद

हुसेन दलवाई

संजय दत्त

मुजफ्फर हुसेन

राष्ट्रवादीतील इच्छुक उमेदवार पुढीलप्रमाणे -

राज्यसभा

ईश्‍वरलाल जैन

तारिक अन्वर

डी. पी. त्रिपाठी

पितांबर मास्टर

रामराजे निंबाळकर

सूर्यकांता पाटील

निवेदिता माने

विधानपरिषद

विजयसिंह मोहिते-पाटील

संतोष चौधरी

प्रकाश बेंसाळे

रामराजे नाईक निंबाळकर

भाजपमधील इच्छुक उमेदवार पुढीलप्रमाणे -

विधानपरिषद

धनंजय मुंडे

मधू चव्हाण

शोभाताई फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2010 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close