S M L

शरद पवारांची निवृत्तीची वेळ आलीये-सुभाष देशमुख

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2017 08:54 PM IST

शरद पवारांची निवृत्तीची वेळ आलीये-सुभाष देशमुख

21 जानेवारी : केवळ चार वेळा खासदार असलेल्या शरद पवारांच्या निवृत्तीची वेळ आली आहे असा सल्लाच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलाय. एवढंच नाहीतर राष्ट्रवादीचे खासदार कधी पक्ष सोडतील याची शाश्वती नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

बारामती तालुक्यातील कारखेल येथे भाजपच्या वतीनं सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.त्यावेळी बोलताना त्यांनी पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर चौफेर टीका केली ७० हजार कोटी रुपये खर्चूनही बारामतीच्या जिरायत भागात पाणी आलं नाही ही दुर्भाग्याची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं बारामतीत कार्यकर्त्यांनी बोगस मतदान करून बोगस नेते तयार केल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. २००४ साली शरद पवार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होत. मात्र ते साध्य झालं नाही. आता तर तशी परिस्थितीही राहिलेली नाही. त्यामुळं केवळ चार खासदार असलेल्या पवारांच्या निवृत्तीची वेळ आली असल्याचा सल्ला देशमुख यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2017 08:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close