S M L

एअर इंडियाच्या संपाला स्थगिती

26 मेदिल्ली हायकोर्टाने एअर इंडियाच्या संपाला 31 मेपर्यंत स्थगिती दिली आहे. संप अवैध ठरवण्याच्या मागणीसाठीच्या याचिकेवर ही सुनावणी झाली. कालपासून एअर इंडियाचे 20 हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. तर काही आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशभरातील एअरपोर्ट्सवर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मंगलोर विमान अपघात ताजा असताना कर्मचार्‍यांनी असा संप करणे चुकीचे असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. तसेच एअर इंडियाने या संपाविरोधात कडक भूमिका घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2010 12:52 PM IST

एअर इंडियाच्या संपाला स्थगिती

26 मे

दिल्ली हायकोर्टाने एअर इंडियाच्या संपाला 31 मेपर्यंत स्थगिती दिली आहे. संप अवैध ठरवण्याच्या मागणीसाठीच्या याचिकेवर ही सुनावणी झाली.

कालपासून एअर इंडियाचे 20 हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. तर काही आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशभरातील एअरपोर्ट्सवर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मंगलोर विमान अपघात ताजा असताना कर्मचार्‍यांनी असा संप करणे चुकीचे असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. तसेच एअर इंडियाने या संपाविरोधात कडक भूमिका घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2010 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close