S M L

'हे राम…नथुराम'विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं

Samruddha Bhambure | Updated On: Jan 23, 2017 10:18 AM IST

'हे राम…नथुराम'विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची  निदर्शनं

23 जानेवारी :  ‘हे राम... नथुराम’ या या नाटकाचा प्रयोग रोखण्यासाठी काल (रविवारी) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. नागपूरमधील वसंतराव नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी आत घुसून आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी 'नाटक होऊ दिले जाणार नाही', असं म्हणत काँग्रेसने मोठा गोंधळ घातला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आंदोलनकर्त्यांना नाट्यगृहातून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर मात्र या नाटकाचा प्रयोग सुरळीतपणे पार पडला.

शरद पोंक्षे लिखित आणि दिग्द‌र्शित ‘हे राम... नथुराम’ या नाटकाचा प्रयोग रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याच्यावरील नाटक सादर केलं जाऊ देणार नाही, असा पवित्रा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. ‘महात्मा गांधी अमर रहे, नथुराम गोडसे मुर्दाबाद’ यांसारख्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

दरम्यान, गेल्या 15 ‌वर्षांपासून या विषयावर मी नाटक करत असून नाटकाला कोर्टाची मान्यतादेखील आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांच्या विरोधाला काहीही अर्थ नाही. केवळ महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा वाद पेटवण्यात येतो आहे. आक्षेपच घ्यायचा असेल तर वादग्रस्त वक्तव्यं करणाऱ्या ओवेसीला विरोध करावा’, असं मत नाटकाचे लेखक-दिग्दर्शक शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close