S M L

मुलुंडमध्ये भर वस्तीत दिसला बिबट्या

Samruddha Bhambure | Updated On: Jan 23, 2017 03:46 PM IST

 मुलुंडमध्ये भर वस्तीत दिसला बिबट्या

23 जानेवारी : मुंबईतल्या मुलुंड पश्चिममध्ये घाटीपाडा विभागात काल (रविवारी) मध्यरात्रीनंतर एक बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसला. घाटीपाडा विभागात असलेल्या लोकनिसर्ग सोसायटीच्या आवारात हा बिबट्या फिरताना तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला.

संजय गांधी उद्यानाला लागून असलेल्या भांडुप-मुलुंड मधील अनेक नागरी वस्त्यांमध्ये बिबट्या फिरताना दिसत असतो. काल रात्री 2 वाजेच्या सुमारास हा बिबट्या लोकनिसर्ग सोसायटीच्या समोर आला असल्याचं सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मात्र त्यानंतर तो कुठे गेला, ते काही समजू शकलं नाहीये. आज सकाळी याबाबतची माहिती तिथल्या रहिवाश्यांनी वन विभागला दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close