S M L

रणवीरसारखा आणखी एक चेहरा पाकिस्तानात

Sonali Deshpande | Updated On: Jan 23, 2017 01:28 PM IST

रणवीरसारखा आणखी एक चेहरा पाकिस्तानात

23 जानेवारी : असं म्हणतात जगात एका चेहऱ्याची 7 माणसं असतात. हे असे सारखे दिसणारे चेहरे जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपण असेच चक्रावून जातो. नुकताच पाकिस्तानातच रणवीर सिंगचा लूकलाईक स्पॉट झालाय. त्याचं नाव आहे अहमद शोएब. तिकडे तो चर्चेचा विषय ठरतोय. तो पाकिस्तानातला व्यावसायिक आहे आणि सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांचे फोटोज सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

शोएब रणवीरचा मोठा फॅन आहे. शोएब म्हणतो की,'मी त्याची नक्कल करत नाहीये. मात्र मला त्याचा लुक आवडतो. मी माझी तुलना रणवीरशी करत नाही. मला त्याची पर्सनॅलिटी आवडते.'

भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली याचेही असे दोन लूकलाईक आहेत. एक म्हणजे पाकिस्तानी फलंदाज अहमद शहजाद तर दुसरा पाकिस्तानी अभिनेता फवाद खान. या तिघांच्या दिसण्यामध्ये खूप जास्त साम्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close