S M L

भाजपच मोठा भाऊ हे लक्षात घ्या, दानवेंचा सेनेला इशारा

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2017 07:07 PM IST

भाजपच मोठा भाऊ हे लक्षात घ्या, दानवेंचा सेनेला इशारा

23 जानेवारी :  संख्या आमची जास्त आहे, त्यामुळे भाजपच सर्वात मोठा पक्ष आहे हे शिवसेनेनं वास्तव स्विकारावं असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपचा 'मोठा भाऊ' असल्याचं ठणकावून सांगितलं. तसंच चर्चा किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. त्यांना आमच्या फॉर्म्युला मान्य असो की नसो आमचा फॉर्म्युला 2014 चा आहे असंही  दानवे यांनी स्पष्ट केलं.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युतीची चर्चा पुन्हा एकदा फिस्कटलीये. दोन्ही पक्षांनी युतीची अपेक्षा करत स्वबळावर लढण्याची तयारीही सुरू केलीये. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सडेतोड भूमिका मांडली.

आत्तापर्यंत पारदर्शकतेच्या मुद्यावर चर्चा झाली आहे. शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे पण शिवसेनेनं योग्य प्रस्ताव दिला नाही. शिवसेनेचा प्रस्ताव 55 ते 60 जागांचा आहे. या प्रस्तावावरून त्यांना युती करायची नाही असं दिसते पण आम्ही 114 जागांवर ठाम आहोत. त्यांना फॉर्मुला मान्य असो की नसो आमचा फॉर्म्युला 2014 चा आहे  असं  दानवे यांनी स्पष्ट केलं. तसंच भाजप युतीसाठी तयार आहे निर्णय शिवसेनेनं घ्यावा वास्तव लक्षात घेऊन निर्णय होईल नाही तर भाजप वेगळा विचार करेल असा इशाराही  दानवे यांनी दिला.

आम्ही आमच्या जागांवर ठाम असलो तरी युतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे. शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट बघतो. पण शिवसेनेनं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. संख्या आमची जास्त आहे.  त्यामुळं भाजपच सर्वात मोठा पक्ष आहे. हे वास्तव सेनेनं स्विकारावं असंही दानवे म्हणाले.

आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे आम्हाला जास्त जागा पाहिजे. कल्याण डोंबिवली निवडणुकीत आम्ही वेगळे लढलो आणि दोघांच्याही जागा वाढल्या. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी संपली हे सेनेनं लक्षात घ्यावं असा दाखलाही दानवेंनी दिला.

पुणे आणि पिंपरीसाठी चर्चा सुरू आहे पणनाशिकमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असंही दानवेंनी जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close