S M L

स्कॉलरशिप मिळणार थेट विद्यार्थ्यांना

अमेय तिरोडकर, मुंबई27 मे राज्यातील अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी वर्गातील कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक खूषखबर आहे. त्यांना राज्य सरकारतर्फे मिळणारी स्कॉलरशिप आता थेट मिळणार आहे. ही स्कॉलरशिप यापूर्वी कॉलेजेसकडे जात होती. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी वर्गातील सुमारे 31 लाख विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकत आहेत. सामाजिक न्याय विभागाने आता या विद्यार्थ्यांना कॉलेजमार्फत दिली जाणारी स्कॉलरशिप थेट विद्यार्थ्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा जीआरही सरकारने काढला आहे.आत्तापर्यंत सरकार प्रत्येक कॉलेजमधून विद्यार्थ्यांची संख्या मागवून घेऊन स्कॉलरशिप पाठवत असे. यातून अनेक गैरप्रकार घडत. आता ते टळतील, असा विश्वास विरोधी पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनाही वाटत आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासूनच ही योजना लागू होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2010 02:37 PM IST

स्कॉलरशिप मिळणार थेट विद्यार्थ्यांना

अमेय तिरोडकर, मुंबई

27 मे

राज्यातील अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी वर्गातील कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक खूषखबर आहे. त्यांना राज्य सरकारतर्फे मिळणारी स्कॉलरशिप आता थेट मिळणार आहे. ही स्कॉलरशिप यापूर्वी कॉलेजेसकडे जात होती.

अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी वर्गातील सुमारे 31 लाख विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकत आहेत.

सामाजिक न्याय विभागाने आता या विद्यार्थ्यांना कॉलेजमार्फत दिली जाणारी स्कॉलरशिप थेट विद्यार्थ्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा जीआरही सरकारने काढला आहे.

आत्तापर्यंत सरकार प्रत्येक कॉलेजमधून विद्यार्थ्यांची संख्या मागवून घेऊन स्कॉलरशिप पाठवत असे. यातून अनेक गैरप्रकार घडत. आता ते टळतील, असा विश्वास विरोधी पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनाही वाटत आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासूनच ही योजना लागू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2010 02:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close