S M L

वसईत प्रचाराची धामधूम

27 मेयेत्या 30 मे रोजी वसई महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. वसई पालिकेच्या 89 प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यातील वॉर्ड क्रमांक 81 मधून बहुजन विकास आघाडीच्या सुषमा ठाकूर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते प्रचारासाठी फिरत आहेत. शिवसेनेतर्फे मनोहर जोशी, राष्ट्रवादीकडून आर. आर. पाटील, तर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या प्रचार सभा झाल्या. वसई जनआंदोलन समितीतर्फे आमदार विवेक पंडित प्रचारात उतरलेत. तर काँग्रेसचा राज्य स्तरावरील एकही नेता प्रचारासाठी फिरकलेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2010 03:17 PM IST

वसईत प्रचाराची धामधूम

27 मे

येत्या 30 मे रोजी वसई महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे.

वसई पालिकेच्या 89 प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यातील वॉर्ड क्रमांक 81 मधून बहुजन विकास आघाडीच्या सुषमा ठाकूर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते प्रचारासाठी फिरत आहेत.

शिवसेनेतर्फे मनोहर जोशी, राष्ट्रवादीकडून आर. आर. पाटील, तर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या प्रचार सभा झाल्या. वसई जनआंदोलन समितीतर्फे आमदार विवेक पंडित प्रचारात उतरलेत.

तर काँग्रेसचा राज्य स्तरावरील एकही नेता प्रचारासाठी फिरकलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2010 03:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close