S M L

जया बच्चन यांनी उमेदवारी नाकारली

28 मेजया बच्चन यांनी अखेर समाजवादी पक्षाने देऊ केलेली राज्यसभेची उमेदवारी नाकारली आहे. या उमेदवारीवरून बच्चन कुटुंबीयांमध्ये एकमत नव्हते. कुटुंबातूनच विरोध असल्याने मी ही उमेदवारी नाकारत असल्याचे त्यांनी सपाला कळवले आहे. येत्या जुलैमध्ये त्यांच्या खासदारकीची मुदत संपणार आहे. जया यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून मध्यंतरी उलटसुलट चर्चा होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाकडून जया बच्चन यांना तिसर्‍यांदा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. अमरसिंगांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर कदाचित जया बच्चन पक्षाचा राजीनामा देतील, अशी मध्यंतरी चर्चा सुरु होती. तरीही जया बच्चन पक्षातच राहिल्या. त्यामुळे जया बच्चन यांना उमेदवारी मिळाली, त्यावेळी अमरसिंग यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. जया बच्चन यांचा पराभव करण्याचा सपा नेत्यांचा डाव असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर अचानक आज जया बच्चन यांनी उमेदवारी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. जया बच्चन यांनी उमेदवारी नाकारल्याने त्यांच्याऐवजी सपाचे चिटणीस मोहन सिंग यांना उमेदवारी मिळणार असल्याचे समजते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2010 12:04 PM IST

जया बच्चन यांनी उमेदवारी नाकारली

28 मे

जया बच्चन यांनी अखेर समाजवादी पक्षाने देऊ केलेली राज्यसभेची उमेदवारी नाकारली आहे. या उमेदवारीवरून बच्चन कुटुंबीयांमध्ये एकमत नव्हते.

कुटुंबातूनच विरोध असल्याने मी ही उमेदवारी नाकारत असल्याचे त्यांनी सपाला कळवले आहे.

येत्या जुलैमध्ये त्यांच्या खासदारकीची मुदत संपणार आहे. जया यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून मध्यंतरी उलटसुलट चर्चा होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाकडून जया बच्चन यांना तिसर्‍यांदा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.

अमरसिंगांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर कदाचित जया बच्चन पक्षाचा राजीनामा देतील, अशी मध्यंतरी चर्चा सुरु होती. तरीही जया बच्चन पक्षातच राहिल्या. त्यामुळे जया बच्चन यांना उमेदवारी मिळाली, त्यावेळी अमरसिंग यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती.

जया बच्चन यांचा पराभव करण्याचा सपा नेत्यांचा डाव असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर अचानक आज जया बच्चन यांनी उमेदवारी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

जया बच्चन यांनी उमेदवारी नाकारल्याने त्यांच्याऐवजी सपाचे चिटणीस मोहन सिंग यांना उमेदवारी मिळणार असल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2010 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close