S M L

पुण्यात बसखरेदीसाठी उपोषण

28 मेपुणे महापालिका आणि पीएमपीच्या वादामुळे तब्बल 350 कोटींची बसखरेदी रखडली आहे. या बसेसची खरेदी ताबडतोब केली जावी, या मागणीसाठी भाजपचे नगरसेवक विकास मठकरींनी उपोषण सुरू केले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुण्यासाठी डाव्या बाजूला दरवाजे असणार्‍या बसेसची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर उजव्या बाजूला दरवाजे असणार्‍या बसेस खरेदी कराव्यात, अशी भूमिका पिंपरी-चिंचवड पालिकेने घेतली आहे. तर या वादात हस्तक्षेप करत, दोन्ही बाजूला दरवाजे असणार्‍या बसेस घ्याव्यात, अशी भूमिका पीएमपीचे अध्यक्ष दिलीप बंड यांनी घेतली आहे. या वादामुळे बसेसची खरेदी मात्र रखडली आहे. ही खरेदी सुरू व्हावी म्हणून मठकरींनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2010 01:05 PM IST

पुण्यात बसखरेदीसाठी उपोषण

28 मे

पुणे महापालिका आणि पीएमपीच्या वादामुळे तब्बल 350 कोटींची बसखरेदी रखडली आहे. या बसेसची खरेदी ताबडतोब केली जावी, या मागणीसाठी भाजपचे नगरसेवक विकास मठकरींनी उपोषण सुरू केले आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुण्यासाठी डाव्या बाजूला दरवाजे असणार्‍या बसेसची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर उजव्या बाजूला दरवाजे असणार्‍या बसेस खरेदी कराव्यात, अशी भूमिका पिंपरी-चिंचवड पालिकेने घेतली आहे.

तर या वादात हस्तक्षेप करत, दोन्ही बाजूला दरवाजे असणार्‍या बसेस घ्याव्यात, अशी भूमिका पीएमपीचे अध्यक्ष दिलीप बंड यांनी घेतली आहे.

या वादामुळे बसेसची खरेदी मात्र रखडली आहे. ही खरेदी सुरू व्हावी म्हणून मठकरींनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2010 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close