S M L

लाहोरमधील दहशतवादी हल्ल्यात 70 ठार

28 मेआज पाकिस्तानमधील लाहोरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळ जवळ 70 लोक मारले गेलेत. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरातील मॉडेल टाऊन आणि घारी शाहू या दोन मशिदीत दहशतवादी घुसले होते. या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या मशिदीत पोलिसांनी काही बॉम्बदेखील निकामी केले. दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा हल्ला सुरू झाला. जुम्म्याची नमाज अदा कराताना दहशतवाद्यांचे दोन गट स्वयंचलित रायफल आणि ग्रेनेडसह दोन वेगळ्या वेगळ्या भागातील मशिदीत शिरले. मॉडेल टाऊन भागात असलेल्या या मशिदीत नमाजासाठी जवळपास 2 हजार लोक जमले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2010 03:50 PM IST

लाहोरमधील दहशतवादी हल्ल्यात 70 ठार

28 मे

आज पाकिस्तानमधील लाहोरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला झाला.

या हल्ल्यात जवळ जवळ 70 लोक मारले गेलेत. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शहरातील मॉडेल टाऊन आणि घारी शाहू या दोन मशिदीत दहशतवादी घुसले होते. या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

या मशिदीत पोलिसांनी काही बॉम्बदेखील निकामी केले. दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा हल्ला सुरू झाला. जुम्म्याची नमाज अदा कराताना दहशतवाद्यांचे दोन गट स्वयंचलित रायफल आणि ग्रेनेडसह दोन वेगळ्या वेगळ्या भागातील मशिदीत शिरले.

मॉडेल टाऊन भागात असलेल्या या मशिदीत नमाजासाठी जवळपास 2 हजार लोक जमले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2010 03:50 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close