S M L

संजय निरुपम मूर्ख माणूस ; शरद पवारांनी फटकारले

Sachin Salve | Updated On: Jan 28, 2017 02:23 PM IST

संजय निरुपम मूर्ख माणूस ; शरद पवारांनी फटकारले

28 जानेवारी :   संजय निरुपम मूर्ख माणूस आहे. त्यांचं महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे ? असा सवाल करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निरुपम यांना सणसणीत चपराक लगावलीये.

कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा तूर्त विचार नाही. राष्ट्रवादी पक्ष एकत्र बसून यावर निर्णय घेईल असं पवारांनी स्पष्ट केलं. यावेळी एका पत्रकाराने राष्ट्रवादी आणि भाजपची छुपी युती आहे अशी टीका संजय निरुपम यांनी केली होती असा सवाल केला असता. पवारांनी निरुपम यांना थेट मूर्ख म्हणून सणसणीत चपराक लगावलीये.

संजय निरुपम मूर्ख माणूस आहे. त्यांचं महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे ?, निदान कोल्हापूरसाठी त्यांनी कधी काही केलंय का ?, ज्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. आणि ते लोक पदावर राहिले तर त्यांचं नाव असतं. पद गेल्यावर त्यांना कुणी विचारत नाही अशी टीकाही शरद पवार यांनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close