S M L

मुरूडच्या समुद्रात 4 पर्यटकांचा मृत्यू

29 मे डॉल्फिन बघण्यासाठी पर्यटकांना समुद्रात घेऊन गेलेली छोटी बोट उलटल्याने चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना दापोलीजवळच्या मुरूडच्या समुद्रात घडली आहे. यात नऊ पर्यटकांना वाचवण्यात यश मिळाले आहे. त्यापैकी चारजणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण वरिष्ठ नागरिक आहेत.डॉल्फिन बघण्यासाठी 12 पर्यटकांना समुद्रात घेऊन गेलेली ही बोट किना-याकडे परतत होती. बोट किना-याजवळ आली असताना मोठी लाट आल्याने घाबरून हे सर्व पर्यटक बोटीच्या एका बाजूला आले. त्यामुळे बोट उलटली. हे सर्व पर्यटक मुंबई परिसरातील असून मुरूडच्या आर्यावर्त हॉटेलमध्ये उतरले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2010 08:56 PM IST

मुरूडच्या समुद्रात 4 पर्यटकांचा मृत्यू

29 मे

डॉल्फिन बघण्यासाठी पर्यटकांना समुद्रात घेऊन गेलेली छोटी बोट उलटल्याने चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना दापोलीजवळच्या मुरूडच्या समुद्रात घडली आहे.

यात नऊ पर्यटकांना वाचवण्यात यश मिळाले आहे. त्यापैकी चारजणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण वरिष्ठ नागरिक आहेत.

डॉल्फिन बघण्यासाठी 12 पर्यटकांना समुद्रात घेऊन गेलेली ही बोट किना-याकडे परतत होती. बोट किना-याजवळ आली असताना मोठी लाट आल्याने घाबरून हे सर्व पर्यटक बोटीच्या एका बाजूला आले. त्यामुळे बोट उलटली.

हे सर्व पर्यटक मुंबई परिसरातील असून मुरूडच्या आर्यावर्त हॉटेलमध्ये उतरले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2010 08:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close