S M L

'माझ्या नावे फक्त एक झाड लावा...'

29 मेप्रा. ग. प्र. प्रधान यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना 5 एप्रिल 2006 रोजी एक पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी स्वतःची शेवटची इच्छा काय आहे, ते स्पष्ट केले होते...5 एप्रिल 2006 प्रिय मित्र, डॉ. नरेंद्र दाभोळकर सप्रेम नमस्कार. हे पत्र माझ्या मृत्यूनंतर 'साधना'त छापावे.पूर्वी तुम्हास लिहिलेले पत्र फाडून टाकावे.पूज्य साने गुरुजींच्या समवेत येरवडा तुरुंगात स्वातंत्र्य चळवळीत 1943 साली राहता आले, हे मी माझे परमभाग्य समजतो.'साधना'मध्ये मला लेखन करता आले. संपादक म्हणून प्रा. वसंत बापट यांच्या समवेत काम करावयास मिळाले. आणि 'साधना ट्रस्ट'साठी मी काही करू शकलो.या सर्व घटनांमुळे मला जीवनात मोठा आनंद मिळाला आणि साफल्य लाभले.'साधना'च्या वाचकांशी दीर्घकाळ लेखनाद्वारे माझा संवाद चालू होता. यामुळेही मला अपार समाधान लाभले.'साधना'तील सर्व सहकारी आणि 'साधना'चे वाचक यांचा मी ऋणी आहे.'साधना'ने पूज्य साने गुरुजींचा वारसा चालवावा.महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी चळवळींचे मुखपत्र म्हणून 'साधना'स मान्यता लाभावी, हीच अपेक्षा.माझ्या पश्चात माझे कसलेही स्मारक करू नये.माझ्यावर प्रेम करणार्‍या मित्रांनी माझी आठवण म्हणून एक झाड लावावे आणि हे झाड पाच वर्षे तरी जगेल अशी व्यवस्था करावी.माझ्याबद्दल आपुलकी वाटणार्‍या संस्थांनी पाच झाडे लावावीत आणि ती पाच वर्षे जगतील अशी व्यवस्था करावी, ही विनंती.समाजाने आणि तुम्ही मित्रांनी माझ्या अपूर्णतेसह मला स्वीकारले, माझ्यावर प्रेम केले, माझे दोष क्षम्य मानले याबद्दल आभार मानण्यास माझ्याजवळ पुरेसे शब्द नाहीत.सर्वांना नमस्कार आपलाग. प्र. प्रधान

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2010 11:46 AM IST

'माझ्या नावे फक्त एक झाड लावा...'

29 मे

प्रा. ग. प्र. प्रधान यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना 5 एप्रिल 2006 रोजी एक पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी स्वतःची शेवटची इच्छा काय आहे, ते स्पष्ट केले होते...

5 एप्रिल 2006

प्रिय मित्र, डॉ. नरेंद्र दाभोळकर सप्रेम नमस्कार.

हे पत्र माझ्या मृत्यूनंतर 'साधना'त छापावे.

पूर्वी तुम्हास लिहिलेले पत्र फाडून टाकावे.

पूज्य साने गुरुजींच्या समवेत येरवडा तुरुंगात स्वातंत्र्य चळवळीत 1943 साली राहता आले, हे मी माझे परमभाग्य समजतो.'साधना'मध्ये मला लेखन करता आले.

संपादक म्हणून प्रा. वसंत बापट यांच्या समवेत काम करावयास मिळाले. आणि 'साधना ट्रस्ट'साठी मी काही करू शकलो.या सर्व घटनांमुळे मला जीवनात मोठा आनंद मिळाला आणि साफल्य लाभले.

'साधना'च्या वाचकांशी दीर्घकाळ लेखनाद्वारे माझा संवाद चालू होता. यामुळेही मला अपार समाधान लाभले.

'साधना'तील सर्व सहकारी आणि 'साधना'चे वाचक यांचा मी ऋणी आहे.

'साधना'ने पूज्य साने गुरुजींचा वारसा चालवावा.

महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी चळवळींचे मुखपत्र म्हणून 'साधना'स मान्यता लाभावी, हीच अपेक्षा.

माझ्या पश्चात माझे कसलेही स्मारक करू नये.

माझ्यावर प्रेम करणार्‍या मित्रांनी माझी आठवण म्हणून एक झाड लावावे आणि हे झाड पाच वर्षे तरी जगेल अशी व्यवस्था करावी.

माझ्याबद्दल आपुलकी वाटणार्‍या संस्थांनी पाच झाडे लावावीत आणि ती पाच वर्षे जगतील अशी व्यवस्था करावी, ही विनंती.

समाजाने आणि तुम्ही मित्रांनी माझ्या अपूर्णतेसह मला स्वीकारले, माझ्यावर प्रेम केले, माझे दोष क्षम्य मानले याबद्दल आभार मानण्यास माझ्याजवळ पुरेसे शब्द नाहीत.

सर्वांना नमस्कार

आपला

ग. प्र. प्रधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2010 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close