S M L

रेल्वे घातपात प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

29 मेपश्चिम बंगालमधील झारग्राम रेल्वे हल्ल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने झारग्राम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. या तक्रारीत माओवादी नेता किंवा माओवादी संघटनांचे नाव नाही. अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी ट्रेनच्या ड्रायव्हरने स्फोटाचा मोठा आवाज ऐकल्याचे या तक्रारीत लिहिण्यात आले आहे. त्यानंतर रेल्वे रुळांमधून धूर निघाल्याचेही ड्रायव्हरने तक्रारीत नमूद केले. दरम्यान झारग्राम रेल्वे घातपातात बळीं गेलेल्यांची संख्या 110 वर पोहोचली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2010 12:33 PM IST

रेल्वे घातपात प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

29 मे

पश्चिम बंगालमधील झारग्राम रेल्वे हल्ल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने झारग्राम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला.

या तक्रारीत माओवादी नेता किंवा माओवादी संघटनांचे नाव नाही. अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी ट्रेनच्या ड्रायव्हरने स्फोटाचा मोठा आवाज ऐकल्याचे या तक्रारीत लिहिण्यात आले आहे. त्यानंतर रेल्वे रुळांमधून धूर निघाल्याचेही ड्रायव्हरने तक्रारीत नमूद केले.

दरम्यान झारग्राम रेल्वे घातपातात बळीं गेलेल्यांची संख्या 110 वर पोहोचली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2010 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close