S M L

सेरेना तिसर्‍या फेरीत

29 मेटॉप सिडेड सेरेना विल्यम्सनं विजयी कामगिरी कायम राखत स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जेसचा तिने 6-1, 6-1 असा दोन सरळ सेटमध्ये सहज पराभव केला. आजच्या मॅचमध्ये सेरेनाने आपल्या तुफान कामगिरीचे प्रदर्शन करत मॅच अवघ्या एका तासातच संपवली. तिच्या या कामगिरीपुढे हतबल झालेल्या ज्युलियाला फक्त दोनच गेम जिंकता आले. चौथ्या फेरीत आता सेरेनाची गाठ पडेल ती रशियाच्या ऍनाश्टेसीयासोबत.नदालही तिसर्‍या फेरीतपुरुष एकेरीत द्वितीय मानांकित राफेल नदालनेही तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. अर्जेंटीनाच्या होरासिओ झॅपोलावचा त्याने 6-2, 6-2 आणि 6-3 असा सहज पराभव केला. नदालने वेगवान सर्व्हिस करत आपल्या प्रतिस्पर्ध्याला फारशी संधीच दिली नाही. चार वेळा फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावणारा नदाल यंदा विजयी कामगिरी करत पाचवे विजेतेपद पटाकावतो का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2010 12:53 PM IST

सेरेना तिसर्‍या फेरीत

29 मे

टॉप सिडेड सेरेना विल्यम्सनं विजयी कामगिरी कायम राखत स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जेसचा तिने 6-1, 6-1 असा दोन सरळ सेटमध्ये सहज पराभव केला.

आजच्या मॅचमध्ये सेरेनाने आपल्या तुफान कामगिरीचे प्रदर्शन करत मॅच अवघ्या एका तासातच संपवली. तिच्या या कामगिरीपुढे हतबल झालेल्या ज्युलियाला फक्त दोनच गेम जिंकता आले. चौथ्या फेरीत आता सेरेनाची गाठ पडेल ती रशियाच्या ऍनाश्टेसीयासोबत.

नदालही तिसर्‍या फेरीत

पुरुष एकेरीत द्वितीय मानांकित राफेल नदालनेही तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. अर्जेंटीनाच्या होरासिओ झॅपोलावचा त्याने 6-2, 6-2 आणि 6-3 असा सहज पराभव केला.

नदालने वेगवान सर्व्हिस करत आपल्या प्रतिस्पर्ध्याला फारशी संधीच दिली नाही.

चार वेळा फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावणारा नदाल यंदा विजयी कामगिरी करत पाचवे विजेतेपद पटाकावतो का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2010 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close