S M L

विधानपरिषदेसाठी घोडेबाजार तेजीत

आशिष जाधव, मुंबई31 मेविधान परिषदेच्या 10 जागांसाठी राज्यात मोठी चुरस लागली आहे. सर्वच पक्षांनी आपल्या मतांचा कोटा बाजूला सारून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. तसेच मतांचा घोडेबाजारही तेजीत आला आहे.संख्याबळ पाहिले तर तर शिवसेना आणि भाजपचा प्रत्येकी एक-एक उमेदवार निवडून येऊ शकतो. पण त्यांनी दोन-दोन अधिकृत उमेदवार उभे केले. तसेच राष्ट्रवादीनेसुद्धा जास्तीचा तिसरा उमेदवार उभा करून काँग्रेसवर कुरघोडी केली. पण काँग्रेसने अखेरच्या क्षणी आपल्या तीन अधिकृत उमेदवारांसोबतच कन्हैय्यालाल गिडवानी आणि विजय सावंत यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. काँग्रेसला चौथ्या उमेदवाराच्या रुपात एखाद्या अपक्ष उमेदवाराला निवडून आणण्यासाठी 9 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेसला आपली अतिरिक्त 18 मते ताब्यात ठेवतानाच मनसे आणि रिडालोसची मतेसुद्धा फोडावी लागणार आहेत. हे गणित कसे सोडवायचे याबाबत मुख्यमंत्री निश्चिंत आहेत.काँग्रेसच्या अपक्ष उमेदवारीच्या खेळीमुळे राष्ट्रवादीला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 8 मते कमी पडत आहेत. पण काँग्रेस मोठा भाऊ म्हणून योग्य तोडगा काढेल, असे राष्ट्रवादीला वाटत आहे.या पाडापाडीतदेखील समझोता झाल्यास आघाडीच्या सात जागा येऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. पण युतीला किमान एक जागा गमवावी लागणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. मग ती जागा सेनेची असेल नाही तर भाजपची. राष्ट्रवादीत घडामोडींना वेगअमेय तिरोडकर, मुंबईकाँग्रेसला जशी चौथी जागा हवी आहे, तशीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही अखेर शनिवारी आपले उमेदवार जाहीर केले. उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर नाराजांची फळीच तयार झाली आहे. विजयसिंह मोहिते पाटलांची यावेळी वर्णी लागेल, अशी चर्चा होती. पण त्यांचे नाव पुढे आलेच नाही. कदाचित विजयदादांची समजूत काढली गेली असेल. पण इतर नाराजांच्या समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. महिला सेलच्या अध्यक्षा सुरेखाताईंचे समर्थक यात आघाडीवर आहेत.आपले सगळे उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादीने काँग्रेससमोर प्रश्नचिन्ह उभे केले. परिषदेला चौथा उमेदवार द्यायचा की नाही याचे...मनसेचे पत्ते झाकलेलेचया निवडणुकीसाठी मनसेने मात्र अजून पत्ते उघडले नाहीत. राज ठाकरेंच्या मनसेने निवडणुकीत एकही उमेदवार उभा केलेला नाही. तरीसुद्धा शेवटचे दोन उमेदवार निवडून आणणे हे सर्वस्वी मनसेच्या हातात असणार आहे. विधानसभेतील संख्याबळ बघितले तर काँग्रेसकडे स्वत:ची आणि अपक्षांची मिळून 99 मते आहेत. राष्ट्रवादीकडे स्वतःची आणि अपक्षांची मिळून 74 मते आहेत. शिवसेना आणि भाजपकडे प्रत्येकी 46 मते आहेत. तर उरलेली 23 मते ही मनसे, रिडालोस, जनसुराज्य आणि इतरांमध्ये विभागलेली आहेत. अपक्ष आणि आघाडी किंवा युतीमध्ये नसलेल्या 52 मतांच्या बळावर आपला उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न होणार आहे. खरं तर, विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचा 27 मतांचा कोटा मिळवावा लागणार आहे.मतांची होणार फिरवा-फिरवीकाँग्रेसला चौथ्या उमेदवारासाठी 9 मते, राष्ट्रवादीला तिसर्‍या उमेदवारासाठी 8 मते, तसेच शिवसेना आणि भाजपला आपल्या दुसर्‍या उमेदवारांसाठी प्रत्येकी 8 मतांची गरज आहे. पण ही निवडणूक गुप्त मतदानाच्या माध्यमातून तिसर्‍या फेरीपर्यंत लढवली जाणार असल्याने मतांची फिरवा-फिरवी मोठ्या प्रमाणात होणार आहे. 23 मतांसाबतच आघाडीसोबतच 29 मतांनाही फोडण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून होणार आहे. त्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचा मनसेच्या 13 मतांपैकी आपल्याला हवी ती मते खेचण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणूनच या घोडेबाजाराच्या निवडणुकीत सध्या मनसेचा भाव वधारलेला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2010 02:42 PM IST

विधानपरिषदेसाठी घोडेबाजार तेजीत

आशिष जाधव, मुंबई

31 मे

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी राज्यात मोठी चुरस लागली आहे. सर्वच पक्षांनी आपल्या मतांचा कोटा बाजूला सारून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. तसेच मतांचा घोडेबाजारही तेजीत आला आहे.

संख्याबळ पाहिले तर तर शिवसेना आणि भाजपचा प्रत्येकी एक-एक उमेदवार निवडून येऊ शकतो. पण त्यांनी दोन-दोन अधिकृत उमेदवार उभे केले. तसेच राष्ट्रवादीनेसुद्धा जास्तीचा तिसरा उमेदवार उभा करून काँग्रेसवर कुरघोडी केली. पण काँग्रेसने अखेरच्या क्षणी आपल्या तीन अधिकृत उमेदवारांसोबतच कन्हैय्यालाल गिडवानी आणि विजय सावंत यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

काँग्रेसला चौथ्या उमेदवाराच्या रुपात एखाद्या अपक्ष उमेदवाराला निवडून आणण्यासाठी 9 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेसला आपली अतिरिक्त 18 मते ताब्यात ठेवतानाच मनसे आणि रिडालोसची मतेसुद्धा फोडावी लागणार आहेत. हे गणित कसे सोडवायचे याबाबत मुख्यमंत्री निश्चिंत आहेत.

काँग्रेसच्या अपक्ष उमेदवारीच्या खेळीमुळे राष्ट्रवादीला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 8 मते कमी पडत आहेत. पण काँग्रेस मोठा भाऊ म्हणून योग्य तोडगा काढेल, असे राष्ट्रवादीला वाटत आहे.

या पाडापाडीतदेखील समझोता झाल्यास आघाडीच्या सात जागा येऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. पण युतीला किमान एक जागा गमवावी लागणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. मग ती जागा सेनेची असेल नाही तर भाजपची.

राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

अमेय तिरोडकर, मुंबई

काँग्रेसला जशी चौथी जागा हवी आहे, तशीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही अखेर शनिवारी आपले उमेदवार जाहीर केले. उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर नाराजांची फळीच तयार झाली आहे.

विजयसिंह मोहिते पाटलांची यावेळी वर्णी लागेल, अशी चर्चा होती. पण त्यांचे नाव पुढे आलेच नाही. कदाचित विजयदादांची समजूत काढली गेली असेल. पण इतर नाराजांच्या समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. महिला सेलच्या अध्यक्षा सुरेखाताईंचे समर्थक यात आघाडीवर आहेत.

आपले सगळे उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादीने काँग्रेससमोर प्रश्नचिन्ह उभे केले. परिषदेला चौथा उमेदवार द्यायचा की नाही याचे...

मनसेचे पत्ते झाकलेलेच

या निवडणुकीसाठी मनसेने मात्र अजून पत्ते उघडले नाहीत. राज ठाकरेंच्या मनसेने निवडणुकीत एकही उमेदवार उभा केलेला नाही. तरीसुद्धा शेवटचे दोन उमेदवार निवडून आणणे हे सर्वस्वी मनसेच्या हातात असणार आहे.

विधानसभेतील संख्याबळ बघितले तर काँग्रेसकडे स्वत:ची आणि अपक्षांची मिळून 99 मते आहेत. राष्ट्रवादीकडे स्वतःची आणि अपक्षांची मिळून 74 मते आहेत. शिवसेना आणि भाजपकडे प्रत्येकी 46 मते आहेत. तर उरलेली 23 मते ही मनसे, रिडालोस, जनसुराज्य आणि इतरांमध्ये विभागलेली आहेत.

अपक्ष आणि आघाडी किंवा युतीमध्ये नसलेल्या 52 मतांच्या बळावर आपला उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न होणार आहे. खरं तर, विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचा 27 मतांचा कोटा मिळवावा लागणार आहे.

मतांची होणार फिरवा-फिरवी

काँग्रेसला चौथ्या उमेदवारासाठी 9 मते, राष्ट्रवादीला तिसर्‍या उमेदवारासाठी 8 मते, तसेच शिवसेना आणि भाजपला आपल्या दुसर्‍या उमेदवारांसाठी प्रत्येकी 8 मतांची गरज आहे. पण ही निवडणूक गुप्त मतदानाच्या माध्यमातून तिसर्‍या फेरीपर्यंत लढवली जाणार असल्याने मतांची फिरवा-फिरवी मोठ्या प्रमाणात होणार आहे.

23 मतांसाबतच आघाडीसोबतच 29 मतांनाही फोडण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून होणार आहे. त्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचा मनसेच्या 13 मतांपैकी आपल्याला हवी ती मते खेचण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणूनच या घोडेबाजाराच्या निवडणुकीत सध्या मनसेचा भाव वधारलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2010 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close