S M L

पाच मुस्लिम देशांना कुवेतचं दार बंद

Sonali Deshpande | Updated On: Feb 3, 2017 04:05 PM IST

पाच मुस्लिम देशांना कुवेतचं दार बंद

03 फेब्रवारी: आत्ता अमेरिकेपाठोपाठ कुवेतनेसुध्दा पाच मुस्लिम देशांना व्हिसा देणं बंद केलं आहे. या पाच देशांमध्ये पाकिस्तानसोबतच सीरिया, इराक, इराण आणि अफगाणिस्तान या चार देशांचा समावेश आहे.

याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यादेशानुसार अमेरिकेने सात देशांच्या नागरिकांना अमेरिकेत बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ कुवेतने घेतलेल्या या निर्णयावर त्यांच्या केंद्रीय सरकारचं म्हणणं आहे की, 'ज्या पाच देशांची नावं यात समाविष्ट आहेत त्या देशांच्या नागरिकांनी व्हिसासाठी अर्ज करू नये. देशाच्या अंतर्गत सुरक्षा आणि सुव्यवस्थेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.'

मुस्लिम अतिरेक्यांनी देशात प्रवेश करू नये, याची खबरदारी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निर्वासित, स्थलांतरित आणि मुळच्या कुवेतेतर नागरिकांशिवाय कुणालाही तिथं प्रवेश मिळणं कठीण होणार आहे. अमेरिकेनंतर कुवेत हा पहिला देश होता ज्यांनी 2011मध्ये सीरियाच्या नागरिकांना देशात बंदी घातली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close