S M L

टीम इंडियाला पुन्हा 'सहारा'

31 मेटीम इंडियाच्या स्पॉन्सर्सशिपसाठी अखेर सहारा कंपनीनेच बाजी मारली आहे. 31 डिसेंबर 2013 पर्यंत सहारा कंपनीच टीम इंडियाची स्पॉन्सर्स राहणार आहे. टीमच्या स्पॉन्सर्सशिपसाठी सहारा ग्रुप आणि भारती एअरटेलमध्ये मोठी स्पर्धा होती. पण शेवटी सहारानेच यात बाजी मारली. बीसीसीआयच्या झालेल्या मार्केटींग कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या करारानुसार पुरुषांच्या टीमसाठी प्रत्येक मॅचमागे 3 कोटी 34 लाख रुपये सहारा कंपनी देणार आहे. पुढच्या साडे तीन वर्षांसाठी हा करार असणार आहे. याआधीही सहारा ग्रुपच टीमचे स्पॉन्सर्स होते. 4 वर्षांसाठी त्यांनी बीसीसीआयबरोबर 400 कोटी रुपयांचा करार केला होता. पण 6 महिन्यांपूर्वी त्यांची मुदत संपल्याने बीसीसीआयने नव्याने स्पॉन्सर्सचा शोध सुरू केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2010 05:49 PM IST

टीम इंडियाला पुन्हा 'सहारा'

31 मे

टीम इंडियाच्या स्पॉन्सर्सशिपसाठी अखेर सहारा कंपनीनेच बाजी मारली आहे.

31 डिसेंबर 2013 पर्यंत सहारा कंपनीच टीम इंडियाची स्पॉन्सर्स राहणार आहे. टीमच्या स्पॉन्सर्सशिपसाठी सहारा ग्रुप आणि भारती एअरटेलमध्ये मोठी स्पर्धा होती. पण शेवटी सहारानेच यात बाजी मारली.

बीसीसीआयच्या झालेल्या मार्केटींग कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या करारानुसार पुरुषांच्या टीमसाठी प्रत्येक मॅचमागे 3 कोटी 34 लाख रुपये सहारा कंपनी देणार आहे.

पुढच्या साडे तीन वर्षांसाठी हा करार असणार आहे. याआधीही सहारा ग्रुपच टीमचे स्पॉन्सर्स होते. 4 वर्षांसाठी त्यांनी बीसीसीआयबरोबर 400 कोटी रुपयांचा करार केला होता.

पण 6 महिन्यांपूर्वी त्यांची मुदत संपल्याने बीसीसीआयने नव्याने स्पॉन्सर्सचा शोध सुरू केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2010 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close