S M L

बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी निवडणुकीच्या रिंगणात

Samruddha Bhambure | Updated On: Feb 4, 2017 03:52 PM IST

suraj parmar

04 फेब्रुवारी : ठाण्यातील बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुरज परमार प्रकरणातील आरोपींनी आज उमेदवारी अर्ज भरला.

यात सुधाकर चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर राबोडी प्रभाग 10 मधून राष्ट्रवादीच्या वतीने नजीबमुल्ला, प्रभाग ७ मधून काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि प्रभाग ६ मधून राष्ट्रवादीचे हनुमंत जगदाळे यांनी आपापले उमेदवारी अर्ज भरले आहेत.

चौघेही सुरज परमार प्रकरणातील आरोपी असून, चौघांनीही ठाणे महानगरपालिकेसाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे आता या उमेदवारांना जनताजनार्धन मताधिक्याने निवडून देते काय? याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2017 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close