S M L

ठाण्यात शिवसेनेच्या शिलेदारांच्या घरात तिकीटांची खैरात !

Sachin Salve | Updated On: Feb 4, 2017 05:59 PM IST

ठाण्यात शिवसेनेच्या शिलेदारांच्या घरात तिकीटांची खैरात !

04 फेब्रुवारी : शिवसेनेची ओळख आहे जात न पहाता उमेदवारी देणारा पक्ष म्हणून. पण ठाण्यातल्या उमेदवारांच्या यादीवर लक्ष टाकलं तर घराणेशाहीचा कळस झाल्याचं लक्षात येईल.

ठाण्यात आमदार असलेल्या प्रताप सरनाईकांच्या घरात त्यांची पत्नी परीषा सरनाईक तसंच मुलगा पुर्वेश सरनाईकला तिकीट देण्यात आलंय. राजन विचारेंच्या कुटुंबातील पत्नी  नंदिनी विचारे आणि पुतण्या मंदार विचारे,  एच एस पाटलांच्या कुटुंबातील एच एस पाटील ( स्वत:) आणि पत्नी कल्पना पाटील आणि सूनबाई स्नेहा पाटील अशी तीन तिकिटं देण्यात आलीयत.

देवराम भोईर यांच्या घरात तर 4 जणांना सेनेनं तिकिट दिलय. स्वत देवराम भोईर, मुलगा संजय भोइर, भूषण भोईर आणि सून उषा भोइर यांचा समावेश आहे.

ठाण्यातील शिवसेना घराणेशाही या नेत्यांच्या नातेवाईकांना शिवसेनेने दिली उमेदवारी

- एकनाथ शिंदे फॅमिलीत १) प्रकाश शिंदे ( भाऊ)

- सुभाष भोइर फॅमिली १) सुमित भोइर ( मुलगा)

- रविंद्र फाटक फॅमिलीत) जयश्री फाटक ( पत्नी )

२) नम्रता फाटक ( वहिनी )

- अनंत तरे फॅमिली १) संजय तरे ( मुलगा ) २) महेश्वरी तरे ( सून )

यांनाही तिकिटं दिली गेलीयत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2017 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close