S M L

पुण्यात पुन्हा वादळी पाऊस

1 जूनपुण्यात आज पुन्हा वादळी वार्‍यांसह जोरदार पाऊस झाला. अरबी समुद्रातील पेट वादळामुळे पुण्यात कालपासून जोरदार पाऊस होत आहे. हे वादळ मान्सूनच्या प्रवासासाठी उपयोगी असल्याचेही सांगण्यात येत आहे. या वादळी पावसाने शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली. ही झाडे इलेक्ट्रिक वायर्सवर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता. सॅलीसबरी पार्क भागात मोठमोठी झाडे पडल्याने काही घरांचे प्रचंड नुकसान झाले.पुरंदर तालुक्यातही वादळी वार्‍यांसह गारांचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2010 11:38 AM IST

पुण्यात पुन्हा वादळी पाऊस

1 जून

पुण्यात आज पुन्हा वादळी वार्‍यांसह जोरदार पाऊस झाला.

अरबी समुद्रातील पेट वादळामुळे पुण्यात कालपासून जोरदार पाऊस होत आहे. हे वादळ मान्सूनच्या प्रवासासाठी उपयोगी असल्याचेही सांगण्यात येत आहे.

या वादळी पावसाने शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली. ही झाडे इलेक्ट्रिक वायर्सवर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता. सॅलीसबरी पार्क भागात मोठमोठी झाडे पडल्याने काही घरांचे प्रचंड नुकसान झाले.

पुरंदर तालुक्यातही वादळी वार्‍यांसह गारांचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2010 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close