S M L

पलाश गाणार कॉमनवेल्थ गेम्सचं गाणं

रेखा भारद्वाज, दिल्ली 1 जूनगायक, संगीतकार पलाश सेन सध्या भलताच खुशीत आहे... त्याचं कारणही तितकंच खास आहे... या वर्षाअखेरीस दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्ससाठी पलाशच्या युफोरिया बँडचं गाणं निवडण्यात आलं आहे... पलाशचं हे गाणं आता कॉमनवेल्थ गेम्सचं अधिकृत गाणं असणार आहे...पलाशच्या सुरेल आवाजामुळे आणि त्याच्या संगातातील मेलेडीमुळे त्याला कॉमनवेल्थ गेम्सचं गाणं तयार करण्याची संधी मिळाली.... जूनमध्ये दक्षिण अफ्रिकेत होणार्‍या फिफा वर्ल्डकपमध्ये पलाशने तयार केलेल्या गाण्याची 30 सेकंदाची झलकही दाखवली जाणार आहे.. या गाण्याचं नाव आहे दिल्ली मेरी जान.... हे गाणं कुठल्याही वयोगटासाठी तयार केलेलं नसून प्रत्येकासाठी तयार केलेलं आहे.... हे गाणं एखाद्या आजीला आवडू शकतं तसंच ते तिच्या नातीलासुध्दा आवडेल..., असा विश्‍वास पलाश व्यक्त करतो. पलाश दिल्लीचाच असल्याने त्यानं हे गाणं अगदी मनापासून तयार केलं आहे... आणि या गाण्यात दिल्लीविषयीच्या माहितीची भर टाकली आहे, ती खुद्द दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी... 'गेट वे टू युअर हार्ट' या नावानं हे गाणं इंग्लिशमध्येही रेकॉर्ड करण्यात आलं आहे... आणि याच गाण्याची झलक आपल्याला दिसणार आहे फिफा वर्ल्डकपमध्ये...

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2010 12:03 PM IST

पलाश गाणार कॉमनवेल्थ गेम्सचं गाणं

रेखा भारद्वाज, दिल्ली

1 जून

गायक, संगीतकार पलाश सेन सध्या भलताच खुशीत आहे... त्याचं कारणही तितकंच खास आहे... या वर्षाअखेरीस दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्ससाठी पलाशच्या युफोरिया बँडचं गाणं निवडण्यात आलं आहे... पलाशचं हे गाणं आता कॉमनवेल्थ गेम्सचं अधिकृत गाणं असणार आहे...

पलाशच्या सुरेल आवाजामुळे आणि त्याच्या संगातातील मेलेडीमुळे त्याला कॉमनवेल्थ गेम्सचं गाणं तयार करण्याची संधी मिळाली.... जूनमध्ये दक्षिण अफ्रिकेत होणार्‍या फिफा वर्ल्डकपमध्ये पलाशने तयार केलेल्या गाण्याची 30 सेकंदाची झलकही दाखवली जाणार आहे.. या गाण्याचं नाव आहे दिल्ली मेरी जान....

हे गाणं कुठल्याही वयोगटासाठी तयार केलेलं नसून प्रत्येकासाठी तयार केलेलं आहे.... हे गाणं एखाद्या आजीला आवडू शकतं तसंच ते तिच्या नातीलासुध्दा आवडेल..., असा विश्‍वास पलाश व्यक्त करतो.

पलाश दिल्लीचाच असल्याने त्यानं हे गाणं अगदी मनापासून तयार केलं आहे... आणि या गाण्यात दिल्लीविषयीच्या माहितीची भर टाकली आहे, ती खुद्द दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी...

'गेट वे टू युअर हार्ट' या नावानं हे गाणं इंग्लिशमध्येही रेकॉर्ड करण्यात आलं आहे... आणि याच गाण्याची झलक आपल्याला दिसणार आहे फिफा वर्ल्डकपमध्ये...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2010 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close