S M L

मोदी देणार ई मेलने उत्तर...

1 जून बीसीसीआयने बजावलेल्या दुसर्‍या कारणे दाखवा नोटिशीला ललित मोदी ई मेलने उत्तर देणार आहेत. आणि त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांचे वकील बीसीसीआय मुख्यालयात जाऊन कागदपत्रांची फाईल सादर करतील. काऊंटी टीमना हाताशी धरून इंग्लंडमध्ये आयपीएल सारखी लीग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याचा आरोप मोदींवर आहे. इंग्लिश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष गाईल्स क्लार्क यांनी बीसीसीआयला ईमेल लिहून तसा संशय व्यक्त केला होता. आणि त्यावरून 6 मे रोजी बीसीसीआयने मोदींवर कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ललित मोदी यांनी 31 मार्चला दिल्लीत 3 काऊंटीच्या अध्यक्षांची भेट घेतली होती. आणि त्यांच्यासोबत टी-20 लीग सुरू करण्यासाठी अनधिकृ तपणे वाटाघाटीही सुरु केल्या होत्या, असे इंग्लिश बोर्डाचे म्हणणे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2010 12:29 PM IST

मोदी देणार ई मेलने उत्तर...

1 जून

बीसीसीआयने बजावलेल्या दुसर्‍या कारणे दाखवा नोटिशीला ललित मोदी ई मेलने उत्तर देणार आहेत. आणि त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांचे वकील बीसीसीआय मुख्यालयात जाऊन कागदपत्रांची फाईल सादर करतील.

काऊंटी टीमना हाताशी धरून इंग्लंडमध्ये आयपीएल सारखी लीग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याचा आरोप मोदींवर आहे.

इंग्लिश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष गाईल्स क्लार्क यांनी बीसीसीआयला ईमेल लिहून तसा संशय व्यक्त केला होता. आणि त्यावरून 6 मे रोजी बीसीसीआयने मोदींवर कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

ललित मोदी यांनी 31 मार्चला दिल्लीत 3 काऊंटीच्या अध्यक्षांची भेट घेतली होती. आणि त्यांच्यासोबत टी-20 लीग सुरू करण्यासाठी अनधिकृ तपणे वाटाघाटीही सुरु केल्या होत्या, असे इंग्लिश बोर्डाचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2010 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close