S M L

शिवानंदन यांच्यासाठी दोघांना डावलले

सुधाकर कांबळे, मुंबई1 जूनराज्याच्या पोलीस महासंचालकपदी नुकतीच डी. शिवानंदन यांची नियुक्ती झाली. मात्र ही नियुक्ती करताना शिवानंदन यांना वरिष्ठ असणार्‍या दोघांना अधिकार्‍यांना डावलून त्यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणी भविष्यात वाद होण्याची शक्यता आहे.पोलीस महासंचालकांची नियुक्ती करताना राज्यातल्या चार डीजी दर्जाच्या अधिकार्‍यांपैकी एकाची नियुक्ती करायची असते. ही नियुक्ती करताना त्या अधिकार्‍यामधील सेवा ज्येष्ठताही पाहावी लागते. मात्र शिवानंदन यांची नियुक्ती करताना हा नियम पाळला गेला नाही. डी. शिवानंदन हे 1976 च्या बॅचचे अधिकारी आहेत. तर हसन गफूर हे 1974 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पी. पी. श्रीवास्तव हे 1975 च्या बॅचचे अधिकारी आहेत. म्हणजेच हे दोन अधिकारी शिवानंदन यांना वरिष्ठ आहेत. या दोघांना डावलून शिवानंदन यांच्या गळ्यात पोलीस महासंचालकाची माळ घातली गेली. त्यामुळे एका नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तेव्हाचे मुंबई पोलीस आयुक्त हसन गफूर यांची प्रतिमा वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर राम प्रधान समितीच्या अहवालातही त्यांच्या कामगिरीवर ताशेरे ओढण्यात आले होते. तरीदेखील, मुख्यमंत्र्यांनी अहवालाला फाटा देत गफूर यांचीच बाजू लावून धरली, आणि त्यांचे नाव महासंचालकाच्या स्पर्धेत असल्याचे सूतोवाच केले.एवढे मोठे राज्य, अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत, पण पोलीस महासंचालकांची नियुक्ती करताना मात्र सगळेच चाचपडतात. मुख्यमंत्री असो, गृहमंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी ...शेवटच्या क्षणापर्यंत कोण महासंचालक होईल आणि कोण पोलीस आयुक्त होईल याबद्दल कुणीच सांगू शकत नाही...यापूर्वी देखील अनेक पोलीस आयुक्तांना, पोलीस महासंचालकांना अनपेक्षितपणे बढत्या मिळाल्या आहेत. पण बर्‍याच वेळेला सेवा ज्येष्ठता डावलून अनेक नियुक्त्या झाल्याचेही आपण पाहिले आहे. त्याला कोर्टात आव्हाने दिली गेली आहेत. मनमानी पद्धतीने नियुक्ती करणार्‍या सरकारचे कोर्टाने यापूर्वीही वाभाडे काढले आहेत. आता शिवानंदन यांच्या नियुक्तीने सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2010 03:57 PM IST

शिवानंदन यांच्यासाठी दोघांना डावलले

सुधाकर कांबळे, मुंबई

1 जून

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नुकतीच डी. शिवानंदन यांची नियुक्ती झाली. मात्र ही नियुक्ती करताना शिवानंदन यांना वरिष्ठ असणार्‍या दोघांना अधिकार्‍यांना डावलून त्यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणी भविष्यात वाद होण्याची शक्यता आहे.

पोलीस महासंचालकांची नियुक्ती करताना राज्यातल्या चार डीजी दर्जाच्या अधिकार्‍यांपैकी एकाची नियुक्ती करायची असते. ही नियुक्ती करताना त्या अधिकार्‍यामधील सेवा ज्येष्ठताही पाहावी लागते. मात्र शिवानंदन यांची नियुक्ती करताना हा नियम पाळला गेला नाही.

डी. शिवानंदन हे 1976 च्या बॅचचे अधिकारी आहेत. तर हसन गफूर हे 1974 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पी. पी. श्रीवास्तव हे 1975 च्या बॅचचे अधिकारी आहेत. म्हणजेच हे दोन अधिकारी शिवानंदन यांना वरिष्ठ आहेत. या दोघांना डावलून शिवानंदन यांच्या गळ्यात पोलीस महासंचालकाची माळ घातली गेली. त्यामुळे एका नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तेव्हाचे मुंबई पोलीस आयुक्त हसन गफूर यांची प्रतिमा वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर राम प्रधान समितीच्या अहवालातही त्यांच्या कामगिरीवर ताशेरे ओढण्यात आले होते. तरीदेखील, मुख्यमंत्र्यांनी अहवालाला फाटा देत गफूर यांचीच बाजू लावून धरली, आणि त्यांचे नाव महासंचालकाच्या स्पर्धेत असल्याचे सूतोवाच केले.

एवढे मोठे राज्य, अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत, पण पोलीस महासंचालकांची नियुक्ती करताना मात्र सगळेच चाचपडतात. मुख्यमंत्री असो, गृहमंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी ...शेवटच्या क्षणापर्यंत कोण महासंचालक होईल आणि कोण पोलीस आयुक्त होईल याबद्दल कुणीच सांगू शकत नाही...

यापूर्वी देखील अनेक पोलीस आयुक्तांना, पोलीस महासंचालकांना अनपेक्षितपणे बढत्या मिळाल्या आहेत. पण बर्‍याच वेळेला सेवा ज्येष्ठता डावलून अनेक नियुक्त्या झाल्याचेही आपण पाहिले आहे. त्याला कोर्टात आव्हाने दिली गेली आहेत. मनमानी पद्धतीने नियुक्ती करणार्‍या सरकारचे कोर्टाने यापूर्वीही वाभाडे काढले आहेत. आता शिवानंदन यांच्या नियुक्तीने सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2010 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close