S M L

राजनीती अखेर रिलीज

4 जूनअनेक वादातून मार्ग राजनीती सिनेमा आज अखेर रिलीज झाला. नसरुद्दीन शहा, नाना पाटेकर, रणबीर कपूर, कतरिना कैफ, अजय देवगण अशी जबरदस्त स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचे भविष्य राजकीय सेन्सॉरशिपमध्ये अडकले होते. मात्र कोणताही राजकीय गाजावाजा न होता हा सिनेमा आज मोठ्या पडद्यावर झळकला. 40 कोटी रुपये खर्चून या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमाचा प्रीमियर काल मुंबईत पार पडला. मात्र बॉलिवूडचे सगळेच तारे आयफा सोहळ्यासाठी श्रीलंकेला गेल्याने बॉलिवूडचे काही जणच या प्रीमियरला आले होते. त्यात आशुतोष गोवारीकर, शेखर कपूर, राकोश मेहरा असे काही जण होते. सिनेमाच्या स्टारकास्टपैकी कतरिना कैफ , रणबीर कपूर, मनोज वाजपेयी आवर्जून हजर होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2010 12:51 PM IST

राजनीती अखेर रिलीज

4 जून

अनेक वादातून मार्ग राजनीती सिनेमा आज अखेर रिलीज झाला.

नसरुद्दीन शहा, नाना पाटेकर, रणबीर कपूर, कतरिना कैफ, अजय देवगण अशी जबरदस्त स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचे भविष्य राजकीय सेन्सॉरशिपमध्ये अडकले होते.

मात्र कोणताही राजकीय गाजावाजा न होता हा सिनेमा आज मोठ्या पडद्यावर झळकला. 40 कोटी रुपये खर्चून या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

या सिनेमाचा प्रीमियर काल मुंबईत पार पडला. मात्र बॉलिवूडचे सगळेच तारे आयफा सोहळ्यासाठी श्रीलंकेला गेल्याने बॉलिवूडचे काही जणच या प्रीमियरला आले होते.

त्यात आशुतोष गोवारीकर, शेखर कपूर, राकोश मेहरा असे काही जण होते. सिनेमाच्या स्टारकास्टपैकी कतरिना कैफ , रणबीर कपूर, मनोज वाजपेयी आवर्जून हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2010 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close