S M L

पाणी पुरवठा खाजगीकरणास लातूरमध्ये विरोध

4 जूनपाणी पुरवठ्याच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी आज लातूरमध्ये बंद पाळण्यात आला. या बंद दरम्यान दोन ठिकाणी दोन बसेसची तोडफोड करण्यात आली. बंदचे आवाहन करणार्‍या सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या 10 नेत्यांना रस्त्यावर उतरताच अटक करण्यात आली. संयोजकांनी आवाहन करण्याआधीच नागरिकांनी या बंदला स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शहरातील गंजगोलाई ही प्रमुख बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. या बंदसाठी मोठी पोलीस कुमक तैनात करण्यात आली होती. अटक झालेल्या संघर्ष समितीच्या नेत्यांची रवानगी पोलीस मुख्यालयात करण्यात आली. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकारण हतबल झाल्याचे सांगत लातूरमधील पाणी पुरवठा योजनेचे खाजगीकरण करण्यात आले आहे. पाणी वाटपाचे कंत्राट लातूर वॉटर सप्लाय मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2010 02:34 PM IST

पाणी पुरवठा खाजगीकरणास लातूरमध्ये विरोध

4 जून

पाणी पुरवठ्याच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी आज लातूरमध्ये बंद पाळण्यात आला.

या बंद दरम्यान दोन ठिकाणी दोन बसेसची तोडफोड करण्यात आली.

बंदचे आवाहन करणार्‍या सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या 10 नेत्यांना रस्त्यावर उतरताच अटक करण्यात आली. संयोजकांनी आवाहन करण्याआधीच नागरिकांनी या बंदला स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

शहरातील गंजगोलाई ही प्रमुख बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. या बंदसाठी मोठी पोलीस कुमक तैनात करण्यात आली होती. अटक झालेल्या संघर्ष समितीच्या नेत्यांची रवानगी पोलीस मुख्यालयात करण्यात आली.

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकारण हतबल झाल्याचे सांगत लातूरमधील पाणी पुरवठा योजनेचे खाजगीकरण करण्यात आले आहे.

पाणी वाटपाचे कंत्राट लातूर वॉटर सप्लाय मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2010 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close